आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसर्‍या ‘सिलिकॉन सिटी’च्या हालचाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोळा वर्षांपूर्वीच्या ऑनलाइन शॉप ट्रेडसीचे दुसर्‍या माळ्यावर असलेले कार्यालय एखाद्या नव्या डिजिटल कंपनीची झलक दाखवते. सुमारे वीसेक जण संगणकावर डोळे रोखून बसलेले आहेत. ट्रेडसीची विशेष गोष्ट आहे की, ही सिलिकॉन व्हॅलीत नाही. ती त्या एक डझनहून जास्त टेक कंपन्यांपैकी एक आहे, जी पश्चिम लॉस एंजलिसमध्ये ऑस्टीन ते ओमाहापर्यंत तिने पाळेमुळे रोवली आहेत. तेथून प्रशांत महासागराच्या लाटा आणि सांता मोनिका, कॅलिफोर्नियाच्या पांढर्‍या वाळूचा किनारा दिसू शकतो. व्हेनिस ते सांता मोनिका दरम्यान सुमारे पाच किलोमीटरचा परिसर लॉस एंजेलिसचा वेगाने वाढणारा टेक्नॉलॉजी हब बनत चालला आहे.

हॉलीवूडशी जवळीक आणि चांगल्या हवामानाने सिलिकॉन बीचवर मोठ्या संख्येने या कंपन्यांना आकर्षित केले आहे. प्राइस वॉटर हाऊस कूपर आणि राष्ट्रीय व्हेंचर कॅपिटल असोसिएशनच्या अहवालानुसार परिसरात 2011 पासून 800 नव्या कंपन्यांनी 1.3 अब्ज डॉलरचे नवे भांडवल प्राप्त केले आहे. त्यात व्हिस्पर, स्नॅपचॅट अशा सोशल मीडिया कंपन्यांचा समावेश आहे. गुगलने व्हेनिसमध्ये एक लाख वर्गफुटात आलिशान कार्यालय थाटले आहे. दुर्बिणीच्या आकाराची त्यांची इमारत फ्रेंक गेहरी यांनी डिझाइन केली आहे. 2012 मध्ये फेसबुकमध्ये प्लेया व्हिस्टामध्ये कार्यालय उघडले आहे.

सिलिकॉन बीचच्या स्फोटक विस्ताराने संकेत मिळतो की, टेक कंपन्यांना उत्तर कॅलिफोर्नियाकडे आकर्षित करणारी वैशिष्ट्ये इतर ठिकाणीदेखील आहेत. ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि क्लाऊड स्टोअरेजमध्ये झालेल्या संशोधनांमुळे कुठेही टेक कंपनी सुरू करणे सोपे आणि स्वस्त झाले आहे.

व्हिस्परचे 26 वर्षीय सीईओ मायकेल हेवर्ड म्हणतात, चांगल्या कंपन्यांना कुठेही निधी मिळू शकतो. अनोख्या कल्पनांवर सिलिकॉन व्हॅलीची एकाधिकारशाही नाही. युजर्सना सोशल नेटवर्कवर अज्ञात मेसेज पाठवण्याची सोय व्हिस्पर अ‍ॅप देते. व्हेनिसमध्ये त्याचे कार्यालय 14000 वर्गफुटांवर आहे. त्यांनी गेल्या वर्षी व्हेंचर कॅपिटलपासून दोन कोटी डॉलर गोळा केले आहेत.

अमेरिकन उद्योजक ही गोष्ट सिद्ध करत आहेत की, कल्पकतेवर एखाद्या क्षेत्राचा एकाधिकार नाही. ते त्यामुळे प्रोव्हो, उटाच्या डोंगरांवर आणि मध्य-पश्चिम मैदानी भागात कंपन्या सुरू करत आहेत. मात्र, लॉस एंजलिस कंपन्यांचे शहर आहे. खरे म्हणजे मनोरंजनाचा व्यवसाय स्थानिक कंपन्यांसाठी संधी प्राप्त करून देतो. व्हेंचर कॅपिटॅलिस्ट अ‍ॅडम लिलिंग सांगतात, हॉलीवूडमध्ये प्रत्येकाजवळ अ‍ॅप आहे. अ‍ॅप नवीन पटकथा आहे.

हॉलीवूडच्या तज्ज्ञतेमुळे डिजिटल व्हिडिओ कंटेंट, प्रॉडक्शन क्षेत्र विकसित होत आहे. व्हेंचर कॅपिटल फंड ग्रेक्रॉफ्ट पार्टनर्सचे संस्थापक डाना सेटल सांगतात, सिलिकॉन बीचमधील व्हिडिओशी संबंधित कंपन्या टीव्ही व चित्रपटाशी संबंधित लोकांना आपल्या अटींवर काम करण्याची संधी देतात. त्यांच्या कंपन्यांनी यू-ट्यूब व्हिडिओ बनवणार्‍या मेकर स्टुडिओत पैसे गुंतवले आहे. अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि यू-ट्यूबने अलीकडेच लॉस एंजलिसच्या पश्चिम भागात कार्यालय थाटले आहे. या कंपन्या परंपरागत नेटवर्क टीव्ही सिस्टिमच्या बाहेर व्हिडिओ कंटेंट बनवत आहेत.

सिलिकॉन बीचच्या नवीन तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सर्वात परिचित कंपनी स्नॅपचॅट आहे. अडीच वर्षांपूर्वी व्हेनिसमध्ये सुरू झालेले फोटो शेअरिंग अ‍ॅप स्नॅपचॅट दिवसभरात 40 कोटी मेसेज पाठवण्याचा दावा करते. सीईओ इवान स्पीगल म्हणतात, सिलिकॉन व्हॅलीतून बाहेर राहण्याने नवनवीन ट्रेंड आणि ग्राहकांची आवड समजण्यात मदत होते. स्नॅपचॅट दळणवळणाच्या भावनात्मक पैलूंशी जोडण्याचा प्रयत्न करते. ट्रेडसीच्या सीईओ डी. नुनजिओ म्हणतात, मला सॅन फ्रान्सिस्को आवडते, पण तेथे राहून जाणू शकत नाही की, सामान्य माणूस तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो.

हॉलिवूडच्या तारकांची भागीदारी
चित्रपट व फॅशन दुनियेतील कित्येक सेलिब्रिटींसाठी टेक कंपन्या आवश्यक वस्तू बनल्या आहेत. अभिनेत्री जेसिका अल्बा सिलिकॉन बीचची ई-कॉमर्स बिझनेस कंपनी द आनेस्ट कोची सहसंस्थापक आहे. ही कंपनी मुलांच्या आणि घरगुती उपकरणांची उत्पादने विक्री करते. सांता मोनिकास्थित ई-कॉमर्स कंपनी बीच मिंटमध्ये केट बोसवर्थ, मेरी केट व अ‍ॅशले ओलसनची भागीदारी आहे. ही कंपनी फॅशन उत्पादने बनवते. जोडे व संबंधित उत्पादने बनवणारी ई-कॉमर्स साइट जस्ट फॅब आणि शूडेझल विलीन झाल्या. जस्ट फॅबचे अध्यक्ष सेलिब्रिटी फॅशन डिझायनर किमोरा ली सिमन्स आहे आणि शूडेझलची सुरुवात किम कर्देशियाने केली आहे.

नवे मॉडेल
समुद्रकिनारी फेरफटक्यासाठी प्रसिद्ध असलेले हे क्षेत्र नव्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासाचे मॉडेल बनले आहे. बिझनेस डेटा संघटन कंपासच्या अहवाल 2012 मध्ये लॉस एंजलिसला सिलिकॉन व्हॅली आणि तेल अवीवनंतर सर्वात मोठा टेक इकोसिस्टीम मानले आहे.