आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 99 वर्ष एकही केस पांढरा नाही, या ज्येष्ठांकडून जाणा 100 वर्षे जगण्याचे सूत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या वर्षात आपल्या अवतीभोवती अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या दीर्घायुष्याच्या एका नव्या वळणावर प्रवेश करणार आहेत. असे अनेक लोक आहेत. त्यांच्या या दीर्घायुष्यामागे कोणते ना कोणते रहस्य दडलेले आहे. काही त्यांच्या सवयीचा व दैनंदिन कामांतील नियमिततेचाही भाग आहे. मग अशा कोणत्या चांगल्या सवयींमुळे हे लोक वयानुसार होणाऱ्या व्याधी आणि आजारावंर मात करू शकले, हे दिव्य मराठी नेटवर्कने जाणून घेतले.
दगडाबाई सांगळे
मातीच्या भांड्यात शाकाहारी भोजन

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात भगवानबाबा गड येथे राहणाऱ्या दगडाबाई सांगळे कायम मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खातात. ९९ वर्षीय दगडाबाई सांगतात की, आजारी पडल्याचे मला कधी आठवतही नाही. जात्यावर दळलेले धान्य त्या खातात. हिरवळीवर झोपणे व पायी चालणे त्यांना खूप आवडते
वैशिष्ट्य : या वयातही त्यांच्या डोक्याचे सर्व केस काळे आहेत.
पुढे जाणून घ्या, इतर काही खास ज्येष्ठांविषयी...