आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:चे नियोजन केल्यावरच घडतील सुखद बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशंसा ऐकणे आवडत नसलेल्या लोकांपेक्षा मी फार वेगळी आहे. माझी स्तुती ऐकताना मला फार आनंद होतो. प्रशंसेच्या एका प्रकारामुळे मी अगदी चकित होते. उदाहरणार्थ ‘तू खूपच वेल ऑर्गनाइज्ड आहेस.’ किंवा ‘तू एवढी फोकस्ड कशी राहू शकतेस’. हे ऐकून मी आनंदी होण्याऐवजी चकित होते. हे अगदी एखाद्या पंगू व्यक्तीला ‘तुझे चालणे खूप सुंदर आहे’, असे म्हटल्याप्रमाणे आहे.

मला लहानपणापासून अगदी मोठी होईपर्यंत ‘डिसऑर्गनाइज्ड’, ‘कन्फ्युज्ड’, किंवा ‘टू लॉस्ट’ म्हटले जात असे. माझा भाऊ तर मला नेहमीच दुस-या विश्वात हरवलेली म्हणून चिडवत असे. मला आयुष्यभर याच विशेषणांनी ओळखले गेले, पण आता परिस्थिती बदलत आहे. गेली अनेक वर्षे कायम असलेली माझी ओळख अचानक बदलली कशी? लग्नानंतर हा बदल जाणवू लागला. चौदा वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर खूप बदल दिसून आला. मला माझे मूल आणि काम दोन्ही प्रिय होते. दोघांचेही नुकसान होऊ नये, यासाठी मी स्वत: नियोजन सुरू केले. एक चांगली आर्ई आणि चांगले डॉक्टर बनण्याचा हा मार्ग होता. दुस-या मुलाच्या जन्मानंतर अजून सकारात्मक बदल झाले.

मी माझ्या जीवनशैलीत अनेक सुधारणा केल्या. यासंदर्भात चर्चा करण्याचे कारण म्हणजे, मोठ्या प्रमाणावरील बदल स्वीकारण्यासाठी आपला मेंदू सक्षम असतो. यामुळेच मी स्वत:मध्ये बदल करू शकले. मी उजवा मेंदू वापरणारी महिला आहे. मला एखाद्या गोष्टीची कल्पना करणे आवडते. मला मोठ्या आकाराचे फोटो आवडतात. माझी बहुतांश कामे याभोवतीच फिरत असतात. मी पेशंटची केस ऐकण्याऐवजी त्यांची गोष्ट ऐकते. प्रेझेंटेशनऐवजी बोलण्यातून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करते. मी अहवाल लिहीत नाही किंवा विश्लेषण करत नाही. मला नवनव्या गोष्टी शिकणे आवडते. हीच माझी ताकद आहे. तुम्हाला या सगळ्यात काहीच नवे दिसले नाही, तर माझ्या उजव्या मेंदूला दोष द्या. डाव्या मेंदूत इंटलेक्चुअल भाग असतो. सगळेच निर्णय डावा मेंदू घेत असतो. उत्कृष्ट परिणामांसाठी डाव्या व उजव्या मेंदूचा समतोल वापर करा.
प्रिव्हेन्शन नियतकालिकातून

डॉ. शैलजा सेन
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, फॅमिली थेरपिस्ट, ट्रेनर,