आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत ‘सेमी’पर्यंत पोहोचली बुलेट ट्रेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी देशातील सर्वात वेगवान रेल्वेची चाचणी झाली. नवी दिल्ली ते आग्रादरम्यानच्या रेल्वेचा वेग ताशी 160 किमी होता. भोपाळ-दिल्ली शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा केवळ 20 किमी जास्त. पहिल्यांदा 2009 च्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनची घोषणा केली होती. पाच वर्षांत शताब्दीसारख्या रेल्वेपर्यंत ती पोहोचली. त्याला सेमी बुलेट नाव देण्यात आले. हीच अवस्था अन्य घोषणांबाबतही आहे.

वेग : सहा रुळांना आहे बुलेट ट्रेन धावण्याची प्रतीक्षा
- दिल्ली-चंदिगड-अमृतसर (अंतर 450 किमी)
- हैदराबाद-विजयवाडा-चेन्नई (अंतर 664 किमी)
- हावडा- हल्दिया (अंतर 135 किमी)
- चेन्नई-बंगळुरू-एर्नाकुलम (अंतर 850 किमी)
- दिल्ली-लखनऊ- वाराणसी-पाटणा (अंतर 991 किमी)
- एर्नाकुलम-तिरुवनंतपुरम (अंतर 194 किमी)
- देशात येत्या पाच वर्षांत 2000 किमी अंतरावर हायस्पीड ट्रेन प्रस्तावित आहेत.

1930 पासून मुंबई ते पुणे धावणारी डेक्कन क्वीन देशातील पहिली सुपरफास्ट ट्रेन आहे. मात्र, हिची सुपरफास्ट होण्याची कथा रंजक आहे. सुरुवातीस तिला स्टीम इंजिन लावले होते. ते कुचकामी ठरल्यानंतर डिझेल इंजिन बसवण्यात आले. वेगामुळे तिला सुपरफास्ट नाव लाभले.

सुरक्षा : फायरप्रूफ केबलद्वारे आग नियंत्रणाचा दावा
- शॉर्टसर्किटमुळे आग लागू नये म्हणून रेल्वे नव्याने तयार करत असलेल्या डब्यात अग्निप्रतिबंधक केबल लावत आहे. याव्यतिरिक्त लाइट हॅलोजनही बंद केले जात आहेत.
- राजधानी एक्स्प्रेसच्या एका रॅकमध्ये आग आणि धूर शोधण्यासाठी पहिल्यांदाच ऑटोमॅटिक फायर अलार्म सिस्टिम बसवली आहे.
- 10 वर्षांपासून रेल्वेंना धडकविरोधी उपकरण बसवण्याची नुसतीच चर्चा

कोकण रेल्वे आपल्या रेल्वेमध्ये अशा उपकरणाचा वापर करत आहे. जीपीएसवर त्याचे काम चालते. यात एकाच रुळावर येणार्‍या दोन रेल्वेंचा वेग आपोआप कमी होतो. जगात अशा प्रकारचे हे पहिले उपकरण रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने बनवले आहे.

आराम : वाईट अनुभव सोडा, रेल्वेने आणले अनुभूती डबे
- प्रवाशांचे कितीही वाईट अनुभव असले तरी रेल्वे सध्याची स्थिती बदलण्यासाठी आरामदायक डबे आणत आहे. त्यांना अनुभूती कोच नाव देण्यात आले. प्रत्येक डब्यात अटेंडंट, प्रवाशांच्या सांगण्यावरून तत्काळ डबा स्वच्छ करतील.

हायजीन : स्थानकांवरील दुर्गंधी बायोटॉयलेटने दूर होईल
- जगातील सर्वात घाणेरडी स्थानके, रुळांवरील डाग धुण्यासाठी रेल्वे बायोटॉयलेट आणत आहे. यासाठी डीआरडीओने विशेष बॅक्टेरिया अंटार्क्टिकामधून आणला. सियाचीनमध्ये याची चाचणी घेण्यात आली.