आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’सोबत व्हा सीनियर सिटिझन इंटर्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नागरिक आपली बुद्धिमत्ता व अनुभवातून समाजाला अमूल्य योगदान देऊ शकतात, असा आमचा नेहमीच विश्वास राहिला आहे.

दैनिक भास्कर समूह ‘सीनियर सिटिझन इंटर्न’च्या रूपाने एक नवा प्रारंभ करत आहे. तुमच्या व्यापक अनुभवातून आम्ही शिकू इच्छितो. तुमच्या दृष्टिकोनातून दुनिया पाहू इच्छितो. त्यासाठी दैनिक दिव्य मराठी ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना (निवृत्त सनदी अधिकारी, पोलिस अधिकारी, प्राध्यापक, खासगी क्षेत्रातील एक्झिक्युटिव्ह आदी) त्यांच्या नैपुण्याच्या क्षेत्रातील अनुभव शेअर करण्याची व आपले अनुभव अधिक समृद्ध करण्याची संधी देऊ इच्छितो.

संपादकीय, मनुष्यबळ, ब्रँडिंग, वित्त, प्रशासन यासारख्या अनेक प्रकल्पांत आपल्या अमूल्य अनुभवाचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला दररोज ५ ते ६ तास द्यावे लागतील. तुमच्या नैपुण्याच्या क्षेत्रात मीडियासाठी काम करण्याची तुम्हाला रुची असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला आमच्याशी जोडले जाऊन पुन्हा एक नवी सुरुवात करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी वाचत राहा दिव्य मराठी...!
प्रकल्प स्थळे : भोपाळ, इंदूर, जयपूर, चंदिगड, अहमदाबाद, औरंगाबाद, पाटणा, रांची। प्रकल्प कालावधी - १ वर्ष.
बातम्या आणखी आहेत...