आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Senior Citizen: अमेरिकेत ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या आधुनिक पद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोच्या नॉर्थ बीचजवळ दोन बुजुर्ग डोरोथी आणि िबल ड्वोरस्की प्रसिद्ध इटालियन रेस्टॉरंट, स्ट्रिप क्लब आणि मोबाइल फोन सिग्नलदरम्यान जीवनाचे सुवर्ण क्षण सुखाने घालवत आहेत. हे सिग्नल त्यांच्या अपार्टमेंटमध्ये लावलेल्या मॉनिटरिंग सििस्टम लाइव्हली पाठवतो. या ज्येष्ठांच्या हालचाली काही बदललेल्या आढळल्यास पुत्र फिल याला मोबाइल अलर्ट येतो. त्यांचे औषधांचे डबे, फ्रिजसारख्या वस्तूंशी संबंधित लहान पांढरे सेंसर त्यांच्या हालचाली टिपतो. त्यातून फिलला माहीत होते की, ते नियमित पद्धतीने खात -पीत आहेत, औषधे घेत आहेत. या कामांसाठी त्यांना जवळपास फिरावे, हिंडावे लागत नाही. ८१ वर्षीय बिल आणि ७९ वर्षीय डोरोथी आपल्या शेजा-यांना बोरिंग मानतात.

फिल सांगतात, ते अशा साधनांच्या शोधात होते, ज्यातून त्यांचे आई-वडील घरातून राहून आपल्या गरजा पूर्ण करू शकतात. परंतु कॅमे-यासारख्या अनेक वस्तू उपलब्ध आहेत, ज्या प्रायव्हसीत ढवळाढवळ करतात. त्यामुळेच मी हा मार्ग अवलंबला आहे. गेल्या वर्षीपर्यंत अशी सुविधा उपलब्ध नव्हती. सॅनफ्रान्सिस्कोच्या लिवलीसहित अनेक नव्या कंपन्यांनी ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांकडे लक्ष दिले आहे. अमेरिकेत या वयाच्या समूहांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यासोबतच संशोधकांसमोर समस्यादेखील निर्माण होत आहेत.

स्टेनफोर्ड केंद्राचे संचालक केन स्मिथ सांगतात, पापणी लवताच माणसाचे आयुष्य दुप्पट वाढत आहे. ते म्हणतात, वर्ष २०३२ पर्यंत ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अमेरिकनांची संख्या १५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांपेक्षा जास्त होईल. अर्थ हाच की, ज्येष्ठांची काळजी घेणा-यांची संख्या कमी राहील. सोबतच बाजारात ज्येष्ठांचा प्रभाव जास्त राहील. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ९० टक्के लोकांना वाटते की, ते घरी राहू इच्छितात.

खरे तर टेक कंपन्या म्हाता-या ग्राहकांच्या प्रकरणात अपेक्षेपेक्षा धिम्या आहेत. बहुतांश आंत्रप्रेन्योर तरुण आहेत. ज्येष्ठांच्या सुविधांसाठी नवी कंपनी सुरू करणा-या केटी फिके म्हणतात, खरे म्हणजे हे क्षेत्र लोकांना कमी आकर्षित करते. परंतु, त्यांना भरवसा आहे की, नवे सेंसर तंत्रज्ञान, ज्येष्ठांच्या लोकसंख्या वाढीपेक्षा अधिक लोक या क्षेत्रात येतील.

सुविधा आणि सोय
अनेक कंपन्या ज्येष्ठांना स्वत: जीवन सोपे आणि सुविधाजनक बनवण्यासाठी पाऊल उचलत आहेत. एक लहान कंपनी स्टिचने सांगाती शोधणा-या ज्येष्ठांसाठी सोशल नेटवर्क लाँच केले आहे. युजर्सना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी कंपनी त्यांच्याशी संपर्क करणा-या लोकांच्या ओळखीचा शोध घेते.

आजीबाईंसाठी अ‍ॅप
काही कंपन्यांनी मोबाइल आणि अ‍ॅपचा उपयोग सोपा बनवला आहे. सप्टेंबरमध्ये बोस्टनस्थित ऑस्कर टेकने दोन अ‍ॅप लाँच केले. आजीबाई टॅब्लेटवर ऑस्कर सीनियर अ‍ॅप डाउनलोड करते. त्यातून त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हिडिओ कॉलसारखे आवश्यक फंक्शन सुरू होतात. तिकडे, आजींचा नातू ऑस्कर ज्युनियर डाउनलोड करताे. तो लांब बसून आजीबाईंचा डिव्हाइस मॅनेज करू शकतो.

अ‍ॅपमध्ये सामावले चेकबुक
ट्रू लिंक फायनान्शियलने आजींच्या चेकबुकला पर्याय सादर केला आहे. चेकबुक नेहमी घोटाळेबाजांच्या निशाण्यावर असतो. त्याचे व्हिसा डेबिट कार्ड वृद्धांची मुले किंवा केअर टेकरला पैशांची सीमा ठरवण्यात किंवा संदिग्ध हालचालींबद्दल अलर्ट मेसेज प्राप्त करण्याची सुविधा देईल. मोठी रोकड काढताना अलर्ट जारी होईल.

वाढते वय आणि स्टाइल
सोशल नेटवर्क
नवे सोशल नेटवर्क स्टिच वृद्धांना जोडतो. याचे पाच हजार युजर्स आहेत.
सुरक्षा
लिवली कंपनीच्या स्मार्ट वॉचमध्ये ज्येष्ठांना औषध घेण्याची आठवण करून देणारे फीचर आहेत.
सतर्कता
ट्रू लिंक फायनान्शियल कंपनीच्या कार्ड युजरला फसवणुकीपासून वाचवतो. केअर टेकरला संदिग्ध माहिती मिळते.