आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातव्या वेतन आयोगामागील गुपिते: पत्रे यायची- हे कर्मचारी काम करत नाही, पगार वाढवू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- चांगले काम करणाऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला जाईल, अशी शिफारस आयोगाने केली आहे.
- पगाराचा फायदा सव्वा कोटी कर्मचाऱ्यांना, पण महागाईचा बोजा सव्वाशे कोटी लोकांवर
- न्यायमूर्ती माथूर म्हणाले, माझ्या मानण्याने काय होईल? पगार वाढवला नाही तर संपावर जातील
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. अशोक कुमार माथूर यांच्याशी दैनिक दिव्य मराठी’चे नवलजित सक्सेना मुकुल सिंघवी यांनी चर्चा केली. त्यातील अंश...

भत्त्यांबाबत शिफारशींमध्ये काही विसंगती होती काय, ज्यामुळे सरकारने त्या लागू केल्या नाहीत?
- वेतनवाढीमुळे सरकारवर आधीच एक लाख कोटीहून जास्त रुपयांचा बोजा आला आहे. भत्त्यांमुळे तो वाढेल. सरकार शिफारशींचा आणखी एकदा आढावा घेणार आहे. त्यामुळे समिती स्थापन करून चार महिन्यांचा अवधी मागितला आहे.

सरकार म्हणते वेतनवाढीमुळे मागणी वाढेल, अर्थव्यवस्थेला गती येईल, मात्र महागाई वाढणार नाही. हे कसे शक्य आहे?
- महागाईतर वाढणारच. तुम्ही वेतनवाढीच्या घोषणेआधी म्हणजे २८ जून आणि आजच्या भावांची तुलना करा, महागाई वाढली की नाही, हे समजेल. वेतनवाढीचा फायदा सव्वा कोटी कर्मचाऱ्यांना होत आहे. याचा परिणाम महागाईच्या रुपात सव्वाशे कोटी जनतेला भोगावा लागेल.

८८ भत्ते संपुष्टात आणणे आणि प्रेरणा भत्त्यासारख्या नव्या भत्त्याचा समावेश करण्याचा काय अर्थ आहे? चांगला पगार असेल तर प्रेरणेसाठी वेगळा पैसा का?
- सायकल, हेअर कटिंग, फर्लोसारखे भत्ते समाप्त करण्यास सांगितले. काही भत्ते तर ५० पैशांपासून रुपयापर्यंत होते. नवे भत्ते कामगिरीवर आधारित असून चांगले काम करणाऱ्यास प्रेरणा भत्ता मिळेल.
(न्या. माथूर राजस्थान हायकोर्टात अतिरिक्त महाधिवक्ता होते. नंतर हायकोर्टात न्यायमूर्ती,म. प्र.हायकोर्टात न्यायमूर्ती. प. बंगाल हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती.
नंतर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती. आर्म्स ट्रिब्युनलचे अध्यक्ष.)
पुढील स्लाइड्सवर खुद्दसातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांकडूनच जाणून घ्या, वेतन आयोगाच्या शिफारशींमागील गुपिते....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...