आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसात घ्या अशी काळजी, मग कोणताही \'तेजपाल\' जवळ फिरकणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जस वाढले आहे तसेच नोकरी करण्या-या महिलांची संख्या देखील वाढली आहे. त्याच प्रमाणात कार्यालयांमध्ये लैंगिक शोषणाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी माहिती प्रसारण आणि सेवा उद्योगांमधील महिलांमध्ये एक सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातील 600 महिलांपैकी 88 महिला कर्मचा-यांना कार्यालयामध्ये कोणत्या ना कोणत्या लैंगिक शोषणाचा समाना करावा लागत असल्याचे उघड झाले होते.
दुसरीकडे, महिलांचे म्हणणे आहे, की लैंगिक शोषण हे रोजच्या जगण्याचाच भाग होऊन गेले आहे. त्या म्हणतात, कार्यालयामध्ये एक टक पाहाण्यापासून अश्लिल इशारे करणे, नको तिथे स्पर्ष करणे, आमिष दाखवण्यासारखे अनेक प्रकार घडत असतात.
यावर्षी संसदेत लैंगिक शोषणावर प्रतिबंध आणणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर लैंगिक शोषणाची व्याख्या वाढविण्यात आली आहे. आता नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देखील लैंगिक शोषणाचा प्रकार समजला जात आहे. नुकतेच पत्रकार तरुण तजेपालवर लैंगिक शोषणाचा जो गुन्हा दाखल झाला आहे, तो काही अंशी या प्रकारात मोडणारा आहे.
एका वरिष्ठ पत्रकाराने सहकारी महिलेसोबत असे केल्याने महिलांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
'दिव्य मराठी डॉट कॉम' तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करुन देत आहे, ज्यांची काळजी महिलांनी कार्यालयांमध्ये घेतली पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, तुमच्या सहका-यांचा तुमच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोण कसा आहे..