आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतुलनीय धाडस: वडिलांचा विरोध झुगारून कायद्याचे शिक्षण, अमेरिकेत कंपनी थाटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुलनीय धाडस: वडिलांचा विरोध झुगारून कायद्याचे शिक्षण, अमेरिकेत कंपनी थाटली
०नाव - शीला मूर्ती ०जन्म- 1961 (बडोदरा)
०आई-वडील - एचएमएस श्रीनिवास मूर्ती, भारतीय लष्करात होते.
०शिक्षण- स्टेला मॅरिस कॉलेज चेन्नई, बंगळुरू विद्यापीठातून एलएलबी, हावर्डमधून एलएलएम. @पती - वसंत नायक (मीडिया स्पेशालिस्ट, छायाचित्रकार)
वडिलांचा विरोध असतानाही शीला मूर्ती यांनी जिद्दीने कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना त्यांनी जैसप इंटरनॅशनल मूट कोर्ट कॉम्पेटिशनमध्ये भाग घेतला आणि त्या ऑल इंडिया चॅम्पियन ठरल्या. कायद्याचे पुढील शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती आणि हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएम करण्याची तयारीदेखील त्यांनी सुरू केली; परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे पैशाची चणचण होती. 1987 मध्ये हार्वर्डमधून एलएलएम करण्याचे निश्चित झाले. यासाठी रात्री सुरक्षारक्षकाची नोकरी करायला लागल्या. दरम्यान, एका छायाचित्र प्रदर्शनात वसंत नायक यांच्याशी त्यांची भेट झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले व नंतर दोघांनी लग्न केले. 1989 मध्ये पतीसोबत त्या बाल्टिमोरमध्ये आल्या. येथे रियल इस्टेट आणि बिझनेस लॉ फर्ममध्ये काम सुरू केले. हळूहळू इमिग्रेशन लॉच्या तज्ज्ञ बनल्या. 1994 मध्ये ‘द लॉ ऑफिस ऑफ शीला मूर्ती’ नावाने स्वत:ची इमिग्रेशन कंपनी सुरू केली. पतीने त्यांना संकेतस्थळ बनवण्याचा सल्ला दिला. आधी त्या संकोचल्या, परंतु नंतर याच संकेतस्थळाने त्यांना लोकप्रिय केले.


शीला मूर्ती आणि वसंत नायक दांपत्याने मूर्तिनायक फाउंडेशनची स्थापना केली. महिला, बालक, शिक्षण, आरोग्य आणि भारतातून येणा-या लोकांच्या मदतीसाठी त्यांनी यात गुंतवणूक केली. समाजसेवेतील योगदानाबद्दल 2009 मध्ये त्यांना ‘फिलेन्थ्रॉपिस्ट ऑफ द इयर’ घोषित करण्यात आले.