आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदत मिळाली नाही म्हणून स्वत: स्थापली इतरांना मदत देणारी ऑनलाइन कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीला लेरिओमार्सेलो केअर डॉट कॉमच्या सीईओ आणि चेअरमन आहेत. त्यांची कंपनी जगातला सर्वात मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जेथे प्रत्येक सुविधा सहज उपलब्ध होतात. ९.५ मिलियन लोक केअर डॉट कॉमशी जोडले आहेत. त्यांचे काम १६ देशांमध्ये पोहोचलेले आहे. या स्टार्टअपच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मार्सेलोने यांनी पाच वर्षे वाट पाहिली.

वर्ष २०००मध्ये मार्सेलो दुसऱ्या बाळाची आई झाली होती. दोन मुलांचा सांभाळ करणे जिकिरीचे होत असे. त्या तेव्हा एका स्टार्टअपमध्ये काम करत होत्या. सातत्याने अनेक तास काम करावे लागत होते. वाढत्या जबाबदारीमुळे मदतीसाठी त्यांनी आपल्या आई-वडिलांना फिलिपाइन्स येथून अमेरिकेला बोलावले. परंतु, ती मदतदेखील काही दिवसच मिळाली. कारण त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आईला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे मार्सेलो यांना आता मदतीची आवश्यकता पहिल्यापेक्षा अधिक भासू लागली. त्यांनी ऑनलाइन शोध घेतला परंतु कुणीच मिळाले नाही. त्यांच्या लक्षात आले की, यलो पेजेसमध्ये या समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. तेव्हा अशी एक कंपनी सुरू करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधांचा शोध घेतला. ज्यात आरोग्याशी संबंधित काळजीदेखील सहभागी असली पाहिजे.

एका मुलाखतीत मार्सेलो म्हणाल्या- २००१ ते २००६ दरम्यान पाच वर्षे मी पूर्णपणे शिकण्यासाठी घालवले. माझी इच्छा होती की, व्यवसायाविषयी जेवढे शक्य आहे तेवढे शिकले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की, माझी इच्छा होती माझे कुटुंब या गोष्टीसाठी तयार व्हावे की, मी व्यवसाय करावा. त्यासाठी आम्हाला बऱ्याचदा या विषयावर चर्चा करावी लागली. पाच वर्षे वाट पाहिल्यानंतर केअर डॉट कॉम कंपनी सुरू केली.

कंपनी सुरू करण्यापूर्वी त्या हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये टिचिंग फॅलो आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट होत्या. यानंतर अपरोमाइज नावाच्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजमेंट आणि मार्केटिंग सर्व्हिसेसच्या वीपी राहिल्या. त्यानंतर लिडर्स डॉट कॉममध्ये वीपी आणि जनरल मॅनेजर होत्या. मॅट्रिक्स पार्टनर्समध्ये असताना त्यांनी केअर डॉट कॉमचे नियाेजन केले.

२०१०मध्ये त्यांनी वुमनअप डॉट ओआरजी सुरू केली. याचे तात्पर्य ग्लोबल इकोनॉमीमध्ये महिलांची भागीदारी वाढवण्यासाठी काम करायचे आहे. याद्वारे त्यांनी महिलांना लिडरशिप प्रशिक्षण दिले. महिलांसमोर अनेक आव्हाने असतात. अनेकदा त्यांना तसेच करावे लागते, जशी आई-वडिलांची इच्छा असते. जसे त्यांचा एक भाऊ डॉक्टर आणि एक बहीण दंतचिकित्सक. माझ्यावर दबाव होता की, मी वकील बनावे. त्याकरिता हॉवर्ड येथून लॉ ची पदवी घेतली. जेव्हा मी यंग एक्झिकेटिव्ह होती, तेव्हा सोबत सर्व पुरुष होते. माझी इच्छा होती की, मी अधिक आक्रमक वाटावी. आता त्या कंपनीच्या महिलांनादेखील हेच सांगतात.
बातम्या आणखी आहेत...