आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चूक केल्यानंतर पुरुष ती स्वीकारतही नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) शेरिल सँडबर्ग मानतात की, महिलांनी सर्व प्रकारचे काम करायला तयार राहिले पाहिजे. आपल्या कामाचा त्यांना लळा लागला पाहिजे. त्या स्त्री-पुरुष समानतेच्या समर्थक आहेत. त्यांच्याशी केलेल्या गप्पांतील काही मुद्दे...

योग्य रोमँटिक पार्टनर शोधण्यावर तुम्ही जोर देता. महाविद्यालयांत शिकणार्‍या युवतींनी याबद्दल काय विचार केला पाहिजे?
१> मुलींना महाविद्यालयीन दिवसांपासून समानतेचा विचार केला पाहिजे.गर्लफ्रेंडसारखे रुटीन स्वीकारणे सोपे आहे, उदा. मी कपडे धुऊन घेईन.. बाजूला व्हा, ते काम मी करून देते. लग्नाच्या पहिल्या महिन्यात हे सर्व बरे वाटते. परंतु पाच वर्षांनंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागेल.
महिलांना नोकरीच्या सुरुवातीला कशा प्रकारच्या लैंगिक असमानतेशी तोंड द्यावे लागते?
२> एखाद्या मीटिंगमध्ये नोट्स कोण घेतो? शक्यतो एखादी ज्युनियर महिला हे काम करते. तुम्ही नेहमीच नोट्स घेऊ लागले तर मीटिंगमध्ये पूर्णपणे भाग घेऊ शकणार नाही. तुमचे पुरुष सहकारीसुद्धा नोट्स घेऊ शकतात ना..
करिअरच्या सुरुवातीला साचलेपण आणि निराशा वाटणार्‍या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
३> हे वाटू देऊ नका की, मला करायला नको. उलट असे म्हणा की मी करू शकते. जॉब आणि संधीचा शोध घ्या. तुम्हाला विश्वास नसेल तरीही म्हणा की, मी असे करू शकते.
तुम्ही ड्रायक्लिनिंगसारख्या कामात असाल, तर बॉसला कसे समजावणार की ते गांभीर्याने घ्यावे?
४> सांगावे, मी या कंपनीवर आणि कामावर प्रेम करते. मी कोणतेही काम करायला तयार आहे. पुढे जाऊ इच्छिते. आव्हानात्मक कामे हाती घेऊ इच्छिते. तुम्ही मला अधिक जबाबदारीचे काम देणार का?

तुमची सर्वात मोठ्या चुका कोणत्या आहेत?
१> मुलांच्या संगोपनासह मी करिअरविषयी काळजीत नव्हते. प्रत्येक स्त्रीला असे करावे लागते. आता आपण स्मार्ट झालो आहोत. आव्हाने समजू लागलो आहोत. मी लहान असताना लग्न करून टाकले. त्या वेळी मला लग्नाची गरज नव्हती. मी आयुष्यात खूप सार्‍या चुका केल्या आहेत.
महिला चुका करायला खूप घाबरतात?
२> पुरुषांनी केलेल्या चुका मनापासून ती आपली चूक मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर त्याचा इतका परिणाम होत नाही. आपण पुरुषांची कामे गरजेपेक्षा जास्त उजवे मानतो. महिलांच्या परफॉर्मन्सला कमी लेखतो. आपल्यात पुरुषांच्या चुका सहन करण्याची प्रचंड क्षमता असते.