आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Jayanti Special, Some Part From Book Of Comred Govind Pansare

\'शिवाजी आज असता तर\', कॉम्रेड गोविंद पानरसेंच्या पुस्तकातील काही अंश...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवजयंतीनिमित्त यंदा कॉम्रेड गोविंद पानसरे 'दिव्य मराठी'साठी विशेष लेख लिहिणार होते. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी समीर देशपांडे यांना त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी वा. घरी बोलावले होते. परंतु त्याच दिवशी त्यांच्यावर गोळीबार झाला. काॅम्रेड पानसरे यांच्यावर सध्या कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; पण आम्ही शिवभक्तांसाठी त्यांनी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातील काही अंश देत आहोत. या पुस्तकाच्या आजवर लाख १२ हजारांहून अधिक प्रती वाचकांपर्यंत पाेहोचल्या आहेत...

शिवाजीला सुद्धाज्ञानेश्वर, तुकाराम, म. गांधी यांच्यासारखं विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे. सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध हाेता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा. रयतेला हवं तसं लुटा. खा, प्या, मजा करा. आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं. म्हणजे आम्हीसुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा. आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारांत, क्वचित लाखांत खा. आम्ही कोटींत खाऊ.

शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे. पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढताहेत. झेड.पी.ची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखरसम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कार्पाेरेशन्स म्हणजे वतनदाऱ्या आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे आणि या वतनदाऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत...
रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होताहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठालासुध्दा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची अन् वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारं "शिवाजी महाराज की जय' म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असता तर? त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे. तो स्वत: येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण त्याची शिकवण आहे ना? त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय.

आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू-मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता. पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता पण अंधश्रद्ध नव्हता.
पुढे वाचा, मुस्लिमांबाबतही मांडले परखड मत...