आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Birthday Today News In Marathi

बाळासाहेब ठाकरेंचे ‍निधन झाले तेव्हा शोकाकुल झाला होता संपूर्ण महाराष्ट्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदुत्व आणि मराठीची पताका खांद्यावर घेऊन असंख्य वादळांना सामोरे जाणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 17 नोव्हेंबर 2012 रोजी अखेरचा श्वास घेतला. आपल्या शिवसैनिकांना आणि तमाम मराठी जगताला पोरके करून दुपारी 3.33 वाजता हा वटवृक्ष कोसळला आणि इतिहास निर्माण करणारा एक झंझावात काळाच्या पडद्याआड गेला.

बाळासाहेबांवर उपचार करणार्‍या डॉक्टर चमूचे प्रमुख, विख्यात छातीविकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा 17 नोव्हेंबर 2012 ला सायंकाळी 5.00 वाजता ‘मातोश्री’बाहेर केली होती. ही बातमी पसरताच मुंबईसह महाराष्ट्रभरात सर्वत्र शोकाकुल वातावरण झाले होते.

आपल्या कुंचल्याच्या फटकार्‍याने आणि तळपत्या वक्तृत्वशैलीने महाराष्ट्राला स्वाभिमानाने उभे राहण्याचा मंत्र देणार्‍या या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने महाराष्ट्र किंवा देशच नव्हे, तर जगभरातील मराठी जनमानसावर कुठाराघात झाला होता. प्रत्यक्ष सत्तेत नसतानाही शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर चार दशकांहूनही अधिक काळ स्वत:ची अधिसत्ता प्रस्थापित केली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते बाळासाहेबांचे पार्थिव..