आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

पाहा, शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरेंचे स्‍टायलिश लूक.. .

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणाच्या पटलावर उदयोन्मुख तरुण नेता ते ‘हिंदुहृदयसम्राट’ हा पल्ला गाठत असतानाच बाळासाहेबांनी आपल्या प्रतिमेसोबतच बाह्य व्यक्तिमत्त्वातही वेळोवेळी बदल केल्याचे दिसून येते. व्यंगचित्रकाराच्या हातातील ब्रशची जागा व्यासपीठावरील ‘माईक’ने घेतली तेव्हा बाळ ठाकरे हा तरुण नेता जिथे तिथे सफारी आणि काळ्या फ्रेमच्या चष्म्यात वावरत असे. तेव्हाचा प्रचलित ‘पुढारी’ लूक म्हणजे सफारी, तोच बाळासाहेबांनी उचललेला दिसतो. नंतरच्या काळात शिवसेना स्थापनेसोबतच बाळासाहेब ठाकरे नव्या लूकमध्ये लोकांना सामोरे गेले. पांढरा तलम कुर्ता आणि सलवार, त्यासोबतच भगवी शाल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तसेच त्यांच्या ‘हिंदुत्त्वा’च्या मुद्द्यात भर टाकत होती. कधी ही शाल त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळलेली असे तर कधी खांद्यावर रुळणारी असे. याच दरम्यान कधीतरी त्यांनी गळ्यात रुद्राक्षांची माळ घालायला सुरुवात केली. पांढ-या कुर्त्यावर रुद्राक्षांची माळ आणि कपाळावरील कुंकुमतिलक यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उग्र दिसण्यात भर पडली. या लूकचा ट्रेंड बाळासाहेबांनी इतका प्रसिद्ध केला, की अनेक हिंदी चित्रपटांत त्यांच्यावर बेतलेल्या भूमिकांसाठी बाळासाहेबांचे बाह्य रूप सहीसही कॉपी केले.
त्यांचे ‘क्युबन सिगार’ प्रेम तर सर्वश्रुत होतेच. अनेकदा एका हातात सिगार किंवा हिंदी चित्रपटात दाखवतात तसा ‘पाइप’ घेऊन व्यंगचित्र काढण्यात गुंतलेले बाळासाहेब एखाद्या चित्रातले भासत.
सिनेमातल्यासारखा पाइप ऐटीत तोंडात किंवा हातात मिरवण्याची त्यांना भारी हौस होती. ‘हाईन केन बिअर’ ही खास जर्मन बिअर त्यांना विशेष आवडायची. सिगार आणि बिअरचा ‘राजेशाही’ वाटेल असा थाट असूनही बोंबिल मासा चवीने खाण्यातून त्यांचे मध्यमवर्गीयपण दिसून येई. सुरुवातीला भाषणाला उभे राहिले की कार्यकर्त्यांना आपल्या नजरेचा रोख कळावा यादृष्टीने त्यांच्या मोठ्या गोलाकार काळ्या फ्रेमचा चष्मा महत्त्वाचा घटक होता. फ्रेम बदलली नाही, मात्र काही काळा गॉगल घालून मग काळा चष्मा त्यांनी कायम केला. मध्यंतरी लांबलचक पांढरी दाढी ठेवून ‘ऋषीतुल्य’ लूक ठेवला होता, मात्र त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या लूकमध्ये काहीच फरक राहिला नसल्याने बहुधा त्यांनी पुन्हा फ्रेंच कट दाढी ठेवली. वाघाच्या कातड्यावर उभे असलेले सिंहासन, त्यावर रुबाबाने बसलेले, भगवी कफनी घातलेले, टिळा लावलेले, रुद्राक्षांच्या माळा घातलेले, काळा चष्मा घातलेले आणि खणखणीत आवाजात बोलणारे ही बाळासाहेब ठाकरेंची छबी गेली कित्येक वर्षे तशीच आहे. वयाच्या प्रत्येक वळणावर बाळासाहेबांनी ‘लूक’ बदलला, मात्र त्यांचा ‘चेहरा’ तोच राहिला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बाळ ठाकरेंची भन्‍नाट स्‍टाइल..