आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

मराठवाडा विद्यापीठाच्‍या नामांतरावरून उसळला होता आगडोंब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला आणि त्यावरून संघर्षाची ठिणगी पडली. 6 डिसेंबर 1994 रोजी नांदेडच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी ‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही त्यांना विद्यापीठ कशाला?’ असा प्रश्न विचारून नव्या वादाला तोंड फोडले. रझाकाराच्या भयानक अत्याचाराविरुद्ध आणि जुलमाविरुद्ध मराठवाड्यातील जनता आपले रक्त सांडून व प्राण पणाला लावून लढली.
मराठवाडा या शब्दांतील आमची भावना अत्यंत तीव्र आहे. आमचा इतिहास त्या नावात आहे. मराठवाड्याचे नाव पुसून आंबेडकरांचे नाव कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याने त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. शरद पवारांनी विद्यापीठ नामांतराची घोषणा केली आणि बाळासाहेबांनी आपल्या टीकेची धार आणखीच तीव्र केली. मराठवाड्याला एक उज्ज्वल इतिहास आहे. तो आमच्या भावनांचा प्रश्न आहे, हे नरसिंह राव, शंकरराव यांना माहीत असताना तसे त्यांच्या थोबाडातून बाहेर का येत नाही? तुम्ही शाप घेतलेत जनतेचे. हा शापच पवार, निलंगेकर, विलासराव, पद्मसिंहाचे, काँग्रेसचे भस्म करून टाकेल, असे जाहीर सभेत सांगत बाळासाहेबांनी वातावरण तापवून टाकले. औरंगाबादला ते निषेधाची जाहीर सभा घेण्यासाठी निघाले. सभास्थानी हजारोंची गर्दी जमली होती. पण पुण्याजवळ त्यांना पोलिसांनी रोखले आणि त्यांना परत जावे लागले. त्यानंतर 21 फेब्रुवारी 1994 रोजी परभणीतील सभेत बोलताना त्यांनी नामांतराला जीवनाच्या अंतापर्यंत विरोध करीत राहीन, अशी सडेतोड भूमिका घेत पुण्याजवळ काय झाले ते सांगितले. ते म्हणाले,‘मला पुण्याजवळ अडवले तेव्हा सहज अटक करून घेता आली असती. पण पोलिस सांगत होते- साहेब, तुम्ही अटक करून घेतली तर महाराष्‍ट्र पेटेल. म्हणून सगळ्यांच्या हिताचा विचार करूनच मी परत गेलो.’ विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले. नामविस्तार झाला. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी नामांतराच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,‘मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास मी कधीच विरोध केला नव्हता हे पुन्हा एकदा निक्षून सांगतो. मराठवाड्याचा लढाऊ इतिहास पुसला जाऊ नये हेच आमचे म्हणणे होते. एकदा रा. सू. गवई आमच्याकडे जेवायला आले असताना आमच्यात नामांतराबाबत चर्चा झाली व त्यांना आम्ही हीच भूमिका सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास आम्ही विरोध करण्याचे कारणच नाही. पण ‘मराठवाडा’ हे नाव कायम ठेवून विद्यापीठाचे नामांतर करा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव द्या, असे मी सुचविले. ही भूमिका गवर्इंनाही आवडली्. त्यांनी तत्काळ शरद पवारांना फोन करून हे सांगितले. पवारही या भूमिकेवर खुश झाले व बाळासाहेब, तुमची भूमिका मान्य असल्याचे सांगितले. आता पुन्हा कुणी हा वाद उकरुन काढू नये. काढल्यास मला त्याची पर्वा नाही.’