आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Establish By Balasaheb Thackeray On 19 June 1966

मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेबांनी केली 'शिवसेने'ची स्थापना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. सहदेव नाईक यांनी नारळ फोडला आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पाट्या वाटण्यास सुरुवात झाली. या दोन हजार पाट्या तासाभरातच संपल्या. प्रबोधनकार यांनीच शिवसेनाप्रमुखांना मराठी माणसाची संघटना बांधण्यास सांगितले होते आणि ‘शिवसेना’ नाव सुचविले होते. 26 जून 1966 च्या ‘मार्मिक’मध्ये हा उल्लेख आहे. स्थापनेनंतर ‘मार्मिक’मध्ये विविध कंपन्यांमध्ये होणार्‍या नोकरभरतीच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. त्यात मराठी माणसांची नावे नगण्य असल्याचे स्पष्ट दिसत होते. मराठी माणसामध्ये या अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठीच या याद्या छापल्या जात होत्या. ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी मन चेतविण्याचे प्रयत्न केले जात होते, तर दुसरीकडे शिवसेनेची बांधणी केली जात होती. हे सर्व बाळासाहेबच करीत होते.

प्रबोधनकारांनी 1922 मध्येच मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न हाती घेतला होता. त्यांनी ‘प्रबोधन’मध्ये दाक्षिणात्यांविरुद्ध दोन लेख लिहिले होते. त्यांच्याविरुद्ध दादर, माटुंगा भागातील मद्रासी एकत्र आले आणि खटला भरण्याची तयारी सुरू झाली. सुमारे दोनशे मद्रासी लोकांच्या सह्यांचा अर्ज गव्हर्नरकडे दाखल करण्यात आला आणि चीफ सेक्रेटरीने प्रबोधनकारांना बोलावून घेतले. प्रबोधनकारांनी त्यांच्यापुढे युक्तिवाद करून मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. चीफ सेक्रेटरीला हा मुद्दा पटला आणि त्याने असा आदेश काढला की, कोणत्याही खात्यात जागा रिकामी झाली तर प्रांतीय उमेदवारालाच प्रथम हक्क द्यावा. प्रबोधनकारांचे हेच काम पुढे नेण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, स्थापनेच्या वेळी ठरवलेली कर्तव्याची दिशा