आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Govt Given Green Signal For The Induction Of Shiv Sena

ANALYSIS: या 10 कारणांमुळे हतबल भाजपने शिवसेनेला सत्तेत समावून घेतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेर नाही म्हणता म्हणता शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याचे सगळे सोपस्कर भाजपने पूर्ण केले. लोण्याच्या गोळ्यासाठी सुरु असलेल्या भांडणात प्रथम भाजप वरचढ असल्याचे दिसून येत होते. त्यासाठी अगदी केंद्रीय स्तरावरुन राजकारणाची सुत्रे हलत होती. पण अखेर भाजपच बॅकफुटवर गेला. शिवसेना सरस ठरली. शिवसेनेने अवलंबलेली 'वेट अॅण्ड वॉच' ही रणनिती यशस्वी झाली. भाजपला झुकते घ्यावे लागले. पण शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय अगदी सहज घेण्यात आला नाही. त्यामागे मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. तर जाणून घेऊयात भाजपने शिवसेनेला सत्तेत घेण्यामागची 10 ठळक कारणे...
निवडणुकीपूर्वी भाजपने महायुती तोडली. शिवसेनेला दूर सारले. भाजपला एकहाती सत्ता मिळणे अवघड नाही, असे अकलेचे तारे भाजपच्या काही नेत्यांनी तेव्हा तोडले होते. पण वास्तव काही विपरित होते. भाजपला जास्त जागा मिळाल्या. पण सत्तासुंदरी मात्र दूर राहिली. शिवाय यावेळी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा जाहीर केल्याने दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला. भाजपचे नेते अगदी स्पष्ट बहुमत असल्याच्या तोऱ्यात वागू आणि बोलू लागले. पण पैशांचे आणि बहुमताचे सोंग फार काळ आणता येत नाही. अखेर माघार घ्यावीच लागली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हा पराभव समजावा की फसलेली रणनिती ते येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याची 10 प्रमुख कारणे... भाजपने का घेतली माघार...