आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेटाऱ्यातून नव्हे तर अशी झाली होती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका झाली होती. मराठी बखरीच्या माहितीवरुन ऑगस्ट 1666 मध्ये शिवाजी महाराज आग्र्यातून निघाले. राजपूत पत्रांवरुन 18 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराज बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले.
आलमगीरनामामध्ये शिवाजी महाराजांच्या सुटकेची तारिख 19 ऑगस्ट देण्यात आली आहे. त्यामागे कारण असे, की शिवाजी महाराज दिसेनासे झाल्याने मोगलांनी दिवसभर शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आग्र्यातून बाहेर पडल्याचे जाहिर केले. शिवाजी महाराज आग्र्यात असताना राजपूतांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. या तारखेमुळे शिवाजी महाराजांच्या सुटकेची नेमकी कल्पना राजपुतांना होती, असेही समोर येते.
पुढील स्लाईडवर वाचा, औरंगजेबाला शिवाजी महाराजांना ठार मारायचे होते... त्यासाठी रचले होते वेगवेगळे कट-कारस्थान... पण... मिठाईच्या पेटाऱ्यातून नव्हे तर वेशांतर करुन महाराजांनी करुन घेतली होती सुटका...
संदर्भ- छत्रपती शिवाजी, लेखक-सेतुमाधवराव पगडी