आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shweta Raina Graduate Of The Harvard Business School

हार्वर्डहून परतल्यानंतर समजले, शंभर कॉलेजांत नोकरी का नाही मिळत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : १९ डिसेंबर १९८५
शिक्षण : हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून (एचबीएस) एमबीए व ब्राऊन युनिव्हर्सिटी, अमेरिकेतून अ‍ॅप्लाइड मॅथमॅटिक्स, इंटरनॅशनल स्टडीज व इकॉनॉमिक्समध्ये पदवी.
कुटुंब : ईशान रैना (वडील) मीडिया प्रोफेशनल, अंजली रैना (आई) आधी बँकेत, आता शिक्षण क्षेत्रात कार्यरत.
चर्चेत: हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून दक्षिण आशियासाठी आयोजित न्यू व्हेंचर स्पर्धा जिंकली.

मला आईप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. मात्र, एक स्वतंत्र विचार घेऊन. हार्वर्डमध्ये ऑथेंटिक लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमदरम्यान प्रोफेसर जॅक गॅबरा यांची भेट झाली. एचबीएसमध्ये करत असलेल्या स्वतंत्र प्रोजेक्टविषयी मी त्यांना सांगितल्याचे श्वेता रैना म्हणाल्या. हा प्रोजेक्ट भारतातील वर्क रेडिनेस गॅपवर होता. टेलरिंग स्किल्स डेव्हलपमेंट कंपनीच्या २९ वर्षीय संस्थापक श्वेता रैना यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत...

आयआयटी मुंबई, दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजसारख्या मोठ्या महाविद्यालयांत शिकणार्‍या हुशार विद्यार्थ्यांनाही करिअर गाइडन्सची गरज पडते. देशातील सर्वात अव्वल १ टक्के विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थ्यांची करिअर सुरू करण्यासाठी तयारी नसते.

एमबीए करताना हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये समर ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली. मला इथे सर्व्हिस सेंटरची कार्यक्षमता वाढवायची होती. तसे इथे सर्व ठीकठाक होते. मात्र, इथे काम करणारे बहुतांश व्यावसायिक वेगवेगळ्या ग्राहकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरत होते. आपल्या देशात पुस्तकी ज्ञानामुळे मुले संवाद कौशल्यात कमी पडतात. ी हे कौशल्य आवश्यक आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवून एचबीएसमध्ये त्यावर संशोधन केले. त्याचा उपयोग कंपनी स्थापन करताना झाला.

श्वेता यांनी फ्रान्समध्ये कम्युनिकेशन फर्म गोल्डमॅन सॅक, मुंबईची एक बँक आणि मॅकेन्झी अँड कंपनीमध्ये काही काळ घालवला. मात्र, भारतात टेक्नॉलॉजी स्टार्टअप सुरू करणे सर्वात आव्हानात्मक होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या, कंपनीची संकल्पना स्पष्ट होती. मात्र, कंपनी कशी सुरू करणार? १०० महाविद्यालयांमध्ये गेले तेव्हा विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी त्यांना कॉलेजमध्ये दोन वर्षांपर्यंत शिकवण्यासाठी तयार करण्यात आले.

आत्मविश्वास वाढण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. अशाच एका कार्यक्रमादरम्यान माझी भेट यशशी झाली. त्याची आर्थिक स्थिती नाजूक होती. मात्र, आता विसाव्या वर्षी तो स्वयंपूर्ण झाला आहे. याबरोबर आपल्या देशात बहुतांश विद्यार्थी पीजीनंतर कामाला सुरुवात करतात. अनेक देशांत १६ व्या वर्षीच तरुण आयुष्याचा मार्ग स्वत: निवडतात. यातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणार्‍या कंपन्यांची यादी तयार केली. आदित्य बिर्ला ग्रुप, महिंद्रा पार्टनर्स,गोदरेज ग्रुपसारख्या ५० ओपन माइंडेड ऑर्गनायझेशन्सची नावे समोर आली. पदवीधारकांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिपवर नियुक्त करण्यात आले.

कंपनी सुरू करताच आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. यातूनच मला वर्क रेडिनेस गॅपचे मूळ कारण समजले. मॉक सेशनमध्ये मुलांना ड्रीम कंपनीबाबत विचारले? विद्यार्थ्यांकडे त्याचे उत्तर नव्हते. त्यामुळे वर्क रेडिनेस गॅप कमी करण्यासाठी मुलांना स्वत:ची माहिती असणे आवश्यक असल्याचे समजले.