आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा मुंबईचा सिद्धिविनायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बुद्धीची देवता असलेला गणराया आपल्या भक्तांच्या सगळ्या विघ्नांचे हरण करतो. त्यामुळे कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी प्रथमपूज्य गणरायाचे दर्शन घेतले जाते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शेकडो गणेश मंदिरे आहेत. त्यात प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर हे अतिशय पुरातन देवस्थान आहे. सिद्धिविनायक आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी उसळते.

या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचे रूप अन्य मंदिरातील मूर्तींपेक्षा वेगळे आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केलेली आहे. मूर्तीची उंची अडीच फूट उंच व दोन फूट रूंद आहे. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या गळ्यात जानवे रुपी भुजंग आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सिद्धिविनायकाची पौराणिक आख्यायिका....