आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यवतींना सेंटर आणि साइड स्लिट गाऊनची भुरळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्कर अवॉर्ड्स असो वा ग्रॅमी अवॉर्ड्स... यंदाच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेक सौंदर्यवती सेंटर तसेच साइड स्लिट गाऊनमध्ये दिसल्या. जागतिक कीर्तीची अँजेलिना जोलीने वरसाचे आणि ग्रॅमी 2013 अवॉर्ड्समध्ये जे लो ने अँथली वेसेरेलोने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला. याबाबत डिझायनर अल्पना हिने सांगितले की, अँजेलिना जोली आणि जे लोची शरीरयष्टी सर्वोत्तम आहे. कोणतेही कपडे त्यांना खुलून दिसतात. लांब स्लिट्सचे गाऊनमध्ये व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक दिसते. बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोरा खान हिला थाय-हाय स्लिट्स छान दिसतात. भारतात सेंटर स्लिट गाऊन परिधान करणारी आणि ही संकल्पना प्रसिद्ध करणारी ती पहिलीच अभिनेत्री आहे.

फॅब्रिक साधे ठेवा
फॅशनची देवता म्हणून प्रसिद्ध असलेली रिहाना ग्रॅमी 2013 मध्ये काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. त्यात अगदी साधे फॅब्रिक वापरण्यात आले. डीप व्ही आकाराच्या गळ्याने गाऊनचे सौंदर्य खुलवले. डिझायनर रिना ढाका यांच्या मते रिहाना हे फॅशन जगतातील प्रसिद्ध नाव आहे. ती प्रत्येक ट्रेंड वापरून पाहते. मग ते नेलपॉलिश असो की केशरचना... सगळेच तिच्यावर खुलून दिसते.

अनेक अभिनेत्रींनी वापरले
कर्व्ही फिगरच अभिनेत्री किम करदाशियनने हाय स्लिट गाऊन खूपच आकर्षक परिधान केला. पायांच्या सौंदर्यावर तिचा फोकस होता. त्यात ती यशस्वी झाली. टेलर स्विफ्ट, अँबर हर्ड, मारिया यांनीही ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये सेंटर आणि साइड स्लिट्स परिधान केले होते. प्रिंसेस केट मिडलटन, ट्विलाइट स्टार क्रिस्टेन स्टीवर्ट, रोझी हिनटिंगटन व्हाइटली यासुद्धा रेड कार्पेटवर हाय स्लिट गाऊनमध्ये अवतरल्या होत्या.

हाय हिल, हातात क्लच
केनझो आणि मायकल कोर्सच्या फॅशन शोमध्ये फ्लर्टी स्लिट्सचे अनेक प्रकार पाहण्यास मिळाले. हॉलीवूड अभिनेत्री मेगान फॉक्सने परिधान केलेल्या रोबर्टो कवालीच्या मरून पोशाखावर लांब स्लिट्स छान दिसले. गाऊनचे सौंदर्य वाढवण्यासाठी हाय हिल सँडल आणि हातात क्लच छान दिसेल. या पोशाखावर अगदी हलका मेकअप करावा.

अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशन लेखनातील बहुचर्चित नाव, नवी दिल्ली