आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सहा पद्धतीने कमी करा विसराळूपणाचा त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही स्वयंपाकघराकडे निघालेले आहात आणि तेथे गेल्यानंतर तुम्हाला कळत नाही की, आपण आलोत कशाला? अनेकदा ज्याचे नाव तुम्ही लिहिलेले अथवा बोललेले असते, अशा परिचिताचे नाव नेमके तुमच्या जिभेवर येत नाही. अशा पद्धतीने स्मरणशक्तीचा -हास कोणत्याही वयापासून होऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला या गोष्टीचा सामना करावा लागू शकतो. काही वेळा असे प्रकार ऑर्गेनिक गडबडीमुळे होतात, काही वेळा जखम झाल्याने, अनेकदा न्युरोलॉजिकल आजारामुळे होऊ शकतो. तेव्हा या समस्येवर तुम्ही मात कशी करू शकता, डिमेन्शियासारख्या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी काय करता येते, यासाठी जे संशोधन करण्यात आले, त्या संशोधनातील काही महत्त्वाचे निष्कर्ष...
* उच्च् शिक्षणामुळे मेंदू करतो चांगल्या पद्धतीने काम
उच्च शिक्षण घेतल्याने तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, अगदी म्हातारपणीही. उच्च शिक्षणामुळे स्मरणशक्ती चांगली राहते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे लोक मानसिक पातळीवर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. अगदीच नाही तर किमान वाचन तरी करू लागतात. मेंदूचे व्यायाम अशा पद्धतीने केल्यामुळे मेंदूच्या पेशी कार्यरत राहतात आणि त्यांच्यात आपापसात संपर्क राहतो.
* आधीपासूनच योजना तयार करा
असं समजा की, एखाद्याचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची अथवा चाव्या कुठं ठेवल्या हे लक्षात ठेवण्याची तसदी घेण्याची तुम्हाला इच्छा नाही तर मग तुम्ही सुरुवातीपासूनच प्लॅनिंग करा. कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवायचा असू दे किंवा अन्य कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची दे, एकतर तुम्ही प्लॅनर किंवा कॅलेंडर वापरा. तुमचा चष्मा, पर्स, चाव्या किंवा अन्य गरजेच्या गोष्टी ठेवण्यासाठी घरात एखादी जागा ठेवा, ती बदलू नका.
* स्वत:वर विश्वास हवा
वाढत्या वयामुळे माणसाच्या मनात ज्या धारणा तयार होतात, त्यामध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचे एक कारण सांगितले जाते. साधारणपणे मध्यम वय अथवा वृद्ध लोकांमध्ये स्मरणशक्ती कमी झाल्याच्या समस्या दिसून येतात. पण आपलं वय किती का झालेलं असेना, आपली स्मरणशक्ती कमी होणार नाही, याचा विश्वास ज्यांना असतो, त्यांची स्मरणशक्ती चांगली राहते
* इंद्रियांचा फायदा घ्या
एखादी गोष्ट शिकण्यासाठी तुम्ही जेवढे लक्ष द्याल, तेवढा तुमचा मेंदू स्मरणशक्ती ताजी ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. यासाठी एक निरीक्षण नोंदवण्यात आले. काही जणांना भावनात्मक पद्धतीने शून्याचे चित्र दाखवण्यात आले, पण त्याच बरोबर एक सुगंधही देण्यात आला. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांना सांगण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना आणखी काही चित्रे दाखवण्यात आली, यामध्ये सुगंधाचा मागमूस नव्हता. यानंतर या दोन्ही प्रकारच्या चित्रांची तुलना करण्यास त्यांना जेव्हा सांगण्यात आले, तेव्हा जी चित्रे सुगंधित होती, त्याची आठवण जास्त राहिली. माणसाच्या मेंदूत एक हिस्सा असतो, ज्यामुळे माणसाला गंधाचे ज्ञान होते. तेव्हा तुमच्या घ्राणेंद्रियांवर कायम लक्ष असले पाहिजे. यामुळेही स्मरणशक्ती ताजी राहते.
* जे माहिती करून घ्यायचे, त्याचा पुनरुच्चर करा
जर एखादी गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे, तेव्हा पुन्हा पुन्हा जोरात बोलून ती लक्षात ठेवा किंवा लिहित राहा. यामुळे स्मरणशक्ती सक्रिय राहण्यास मदत होते. असं समजा की, तुम्हाला एखाद्याचे नाव लक्षात ठेवायचे आहे, तेव्हा त्याच्याशी सतत बोलून पुन्हा पुन्हा त्याचे नाव घ्या म्हणजे ते कायम लक्षात राहील.
* महत्त्वाची गोष्ट पुन्हा आठवा
जर तुमच्याकडे वेळच कमी असेल तर तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवू शकणार नाही. असं समजा की, तुम्ही परीक्षा देत आहात तर तुमच्याकडे पाठांतरासाठी वेळ नाही. तेव्हा जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्यासाठी अभ्यास थोडा वेळ थांबवा आणि महत्त्वाची गोष्ट पुन्हा पुन्हा आठवून त्याचा अनुभव घ्या.