आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Faced Terrorist Attack Six Years Back By Pakistani Terrorist

HORRIBLE PIX 26/11: भयाचे ते 60 तास, अंगावर उभा राहतो काटा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सहा वर्षांपूर्वी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेल ताजसह इतरही ठिकाणांना टार्गेट केले होते. केवळ चार दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये रक्ताचा खेळ खेळला होता. तब्बल 59 तास मृत्यूचे तांडव सुरू होते. लोकांचे जीव जात होते. जखमींना मदत मिळत नव्हती. जे जीवंत होते ते जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत होते.
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल तीन दिवस मुंबईत दहशतीचे वातावरण होते. यावेळी ताज हॉटेलजवळ आवाज येत होता, तो केवळ गोळीबाराचा. दहशतवादी निरपराध लोकांवर गोळीबार करीत होते तर भारताचे जिगरबाज जवान त्यांना तोडीस तोड उत्तर देत होते. अखेर भारतीय जवानांनी सर्व दहशतवाद्यांना ठार मारले. मुंबई पोलिस विभागातील कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी कसाब नावाच्या दहशतवाद्याला पकडून ठेवले होते. यात त्यांना मात्र जीव गमवावा लागला. अखेर कसाबचा हिसाब करण्यात आला. त्याला येरवड्यात फाशी देण्यात आली.
या दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रे, बघा पुढील स्लाईडवर