आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात त्वचेची निगा घेण्याचे हे घरगुती उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात त्वचेसंदर्भातील विकार वाढतात. वयाचा परिणामही त्वचेवर दुप्पट हाेते. त्वचेवर काेरडेपणा, पिंपल्स, डाग अशा समस्या निर्माण हाेतात. यासंदर्भात काळजी न घेतल्यास चेहऱ्यावर वयाचा परिणाम दिसून येताेे.  राेजच्या जीवनात काही गाेष्टींकडे लक्ष दिले तर या समस्यांवर मात मिळवू शकाल.  
- अंघाेळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. गरम पाण्यामुळे त्वचा काेरडी हाेते तसेच वयाचा परिणाम चेहऱ्यावर वेगाने दिसायला लागताे. यामुळे काेमट पाण्याने अंघाेळ केलेली कधीही चांगले.  
- रूम हिटर व ड्रायरचा वापर खूप जास्त करू नकाे. यामुळे त्वचा काेरडी पडते. 
- हिवाळ्यात मॉइश्चरायजर वापर करणे गरजेचे असते. चांगली गुणवत्ता असणारे मॉयस्चरायजरचा वापर करा. त्यामुळे तुमची त्वचा नरम राहील.
- वेळाे-वेळी त्वचेच्या स्वच्छतेसाठी  स्क्रब वापरू शकतात. परंतु  सॉफ्ट स्क्रबरचा उपयाेग करू नका.
- बाहेर जाताना शरीर पूर्णपणे झाकले जाईल याची काळजी घ्या. कारण थंडीमुळे त्वचा काेरडी हाेते. कपड्याने झाकल्यामुळे तुमच्या त्वचेचे रक्षण हाेईल.
- अापल्या अाहारावर पूर्ण लक्ष केंद्रीत करा. पुरेसे पाणी घ्या. अापल्या अाहारात  ओमेगा ३ फॅटी अॅसिड व व्हिटामिन-सी युक्त खाद्य पदार्थांचा समावेश करा. यामुळेे त्वचा सुंदर हाेण्यास मदत हाेईल.
- डॉ. किरण धर, डर्मेटोलॉजिस्ट, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...