आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई प्रवासातील अडचणींचा शोध लावेल ‘स्मार्ट पिल’; लवकरच मिळेल ही सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - हवाई प्रवाशांना लवकरच प्रवासाच्या आधी डिजिटल पिल (गोळी) खाण्यासाठी देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान त्यांच्या आरोग्याची सर्व माहिती एअरलाइन्सच्या क्रू (विमानातील कर्मचारी)ला मिळत राहील. त्याचबरोबर त्यांची अॅसिडिटीची पातळी आणि व्हाइटल्सबाबतही माहिती मिळत राहील. इंग्लंडच्या एका एअरवेजने अलीकडेच या डिजिटल पिलच्या पेटंटची नोंदणी केली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी, मिळालेल्या माहितीच्या आधारावरच प्रवाशांचा नाष्टा, जेवण बनवण्यात येणार असल्याचे एअरलाइन्सने सांगितले आहे.

या माध्यमातून प्रवाशाच्या शरीराचे तापमान, झोपेची वेळ आणि हृदयाच्या ठोक्यांची माहिती मिळेल. यामुळे प्रवाशाच्या स्थितीची पूर्ण माहिती मिळेल, अशी अपेक्षा एअरलाइन्सला वाटत आहे. या माहितीच्या आधारावर प्रवाशाला भूक लागली असेल, झोपण्यात अडचण असेल, थंडी किंवा गरमी होत असेल, प्रवासी चिंताग्रस्त होत असेल किंवा त्याला अस्वस्थ वाटत असेल तर याची माहिती मिळेल. त्यानुसार प्रवाशाला मदत करता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशी एखादी अडचण निर्माण झाली तर कर्मचारी विमानातील वातावरणाची सेटिंग बदलेल, प्रवाशाला आरामदायी वाटेल अशा पद्धतीने खुर्चीच्या स्थितीत बदल करेल. प्रवाशाला प्रवासादरम्यान आरामदायी वाटावे त्यासाठीच हा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक हवाई प्रवाशांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी जगभरात एअरलाइन्स कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू आहेत. काही कंपन्या सर्वात कमी प्रवासभाडे देत आहेत, तर काही जास्तीत जास्त सुविधा देत असल्याचे सांगत आहे. स्मार्ट पिलची सुविधा या स्पर्धेचाच भाग असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘स्मार्ट पिल’मध्ये सेन्सर
मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) ने इंजेस्टिबल सेन्सर बनवले आहे. बदामाच्या आकाराचे हे सेन्सर गोळीप्रमाणे काढले जाऊ शकते. कॅलिफोर्नियातील डिजिटल मेडिकल सर्व्हिस प्रोटियस याचा वापर करत आहे. अनेक प्रकारच्या मिनी मायक्रोफोनचा समावेश असलेल्या या सेन्सरवर सिलिकॉनचे कव्हर आहे. पचनक्रियेतून ही गोळी २ ते ३ दिवसांत बाहेर येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...