आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा करा क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर होईल फायदा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढती मिळकत आणि क्रेडिट कार्डच्या वापराचे पर्याय वाढल्याने देशात क्रेडिट कार्डचा बाजार वेगाने वाढत आहे. क्रेडिट कार्डाने खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. परंतु याचा विचारपूर्वक वापर केला तर ही एकदम कामाची वस्तू ठरते.
ज्ञानात भर
०२ कोटीजवळपास क्रेडिट कार्ड ग्राहक भारतात आहेत. हा आकडा वेगाने वाढत आहे, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था कॅशलेस होत आहे. हे एक चांगला संकेत आहे.
१९०० मध्ये अनेक अमेरिकी तेल कंपन्या आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स कार्डबोर्डपासून बनवलेल्या प्रोप्रायटरी कार्डसचा वापर करत होते. हे कार्ड खरेदीसाठी काही ग्राहकांना दिले जात होते. मास्टरकार्डनुसार नंतर ब्रुकलिनचे एक बँकर जॉन बिगिन्सने १९४६ मध्ये चार्ज इट नावाने पहिले बँक कार्ड बाजारात आणले. १९६० च्या दशकात अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वत:ची क्रेडिट कार्ड बाजारात आणली.
वाढत आहेत पर्याय
सध्यादेशात क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मग ती खरेदी असो किंवा देश-विदेशात प्रवास करणे असो. प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये तर ईएमआय खरेदी करण्याचे प्रचलन वेगाने वाढत आहे. देशात गेल्या काही वर्षांत शॉपिग ट्रेंडमध्ये झपाट्याने बदल झाले आहेत. लोकांच्या बिझी लाइफस्टाइलसाठी क्रेडिट कार्डचा वापर एक चांगला सौदा ठरत आहेत. ग्राहकांकडून क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर बँका अनेक प्रकारचे बक्षीस देतात, जे अशा कार्डचा वापर आणि परंपरा वाढवण्यास लावत आहेत.