आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींना आव्हान देण्यासाठी सज्ज स्मृती इराणीचे काही अज्ञात पैलू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन मुलींचे पिता एकदा घरी परतले तेव्हा त्यांच्यासोबत ज्योतिषीदेखील होते. त्यांना तिघांच्या भविष्याबद्दल सांगण्याची विनंती केली. ज्योतिषी म्हणाले, लहान दोघांचे ठीक आहे. मात्र मोठ्या मुलीचे काही नाही होऊ शकत. हे तीव्र शब्द मोठ्या मुलीला झोंबले. खाडकन म्हणाली, जा. मीही इथेच आहे. तुम्हीदेखील इथेच आहात. दोघे बघूया. ज्योतिष्याबद्दल माहीत नाही, मात्र मोठ्या मुलीबद्दल राहुल गांधींच्या विरोधात भाजपची उमेदवार म्हणून उतरवण्याची चर्चा आहे. भेटूया, तीच आहे स्मृती इराणी. अनेक वर्षांपासून टीव्हीद्वारे घराघरात आदर्श सुनेच्या रूपात पोहोचलेली स्मृती भाजपची आक्रमक उपाध्यक्ष म्हणून ओळखली जाते.

ग्लॅमरपूर्वी तीव्र संघर्ष
- पंजाबी पिता आणि आसामी आईची मुलगी स्मृतीचा जन्म दिल्लीत 23 मार्च 1976 रोजी झाला. वडील कुरिअर कंपनी चालवत होते. कौटुंबिक स्थिती ठीक नसल्याने शाळेनंतर बाहेरून बी. ए. पूर्ण केले.
- स्मृतीने दिल्लीत घरोघर फिरून ब्यूटी प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग केले. कोणी तरी मुंबईला नशीब अजमावण्याचा सल्ला दिला.
- स्मृती मुंबईत आली. 1998 मध्ये मिस इंडियासाठी आॅडिशन दिली. निवड झाली. परंतु वडिलांनी त्यात भाग घेण्यास नकार दिला. आईने साथ दिली. स्मृतीला दोन लाख रुपयेही पाठवले. स्पर्धेच्या फायनलला पोहोचली. जिंकली नाही.
- पैसे परत करण्यासाठी नोकरी शोधू लागली. जेट एअरवेजमध्ये फ्लाइट अ‍ॅटेंडंट पदासाठी अर्ज केला. निवड झाली नाही. अनेक मॉडेलिंग आॅडिशनमध्ये रिजेक्ट झाली. अखेर मॅकडोनाल्ड जॉइन केले. तीन महिने वेट्रेस म्हणून काम केले. फरशी पुसली.

टीव्हीवरही सुरुवातीला नाकारली गेली
‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’च्या ऑडिशनसाठी स्मृती गेल्यावर एकता कपूरच्या टीमने तिला नाकारले. मात्र एकताला स्मृती भावली. सर्वांचे मत बाजूला सारून ती म्हणाली, ‘ही तुलसी विराणी होईल. ’

- 2000 ते 2007 तुलसीच्या भूमिकेतील स्मृतीला लागोपाठ सात वर्षे इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. हा एक विक्रम आहे.

परिवार
- जानेवारी 2001 मध्ये स्मृतीने आपल्यापेक्षा दहा वर्षे मोठ्या झुबीन इराणीशी लग्न केले. याच वर्षी तिने जोहर (मुलगा) आणि 2003 मध्ये मुलगी जोएसला जन्म दिला. झुबीनला पहिली पत्नी मोनापासून शॅनेल नावाची मुलगी आहे. मोना आणि स्मृती चांगल्या मैत्रिणी आहेत.

वाद
एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी स्मृतीवर आपल्या मैत्रिणीचे घर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. ज्यावर भाजप नेत्यांनी अनेक दिवस निरुपमशी कोणत्याच प्रकारच्या चर्चेत भाग घेतला नाही.

...आणि भाजपला आणि विरोध केला
- नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध उपोषण करण्याची धमकी दिली होती. आज आहे मोदींची सर्वात विश्वासू..
- 2002 मध्ये गुजरात दंगलीनंतर स्मृतीचा मोदींना उघड विरोध. तेव्हा ती राजकारणात नव्हती. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद न सोडल्यास आमरण उपोषण सुरू करणार असा इशाराही दिला. मात्र तसे काही झाले नाही.
- 2003 मध्ये तिचा भाजपात प्रवेश
- 2013 मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्मृतीने स्पष्ट केले की, माध्यमांच्या उलटसुलट बातम्या पाहून मोदींच्या विरोधात गेले होते. मात्र जेव्हा गुजरातच्या लोकांना भेटले, तेव्हा स्थिती स्पष्ट झाली.
- स्मृतीच्या या मुलाखतीचा यू-ट्यूबवर शेअर्ड व्हिडिओ सुमारे 75000 लोकांनी पाहिला.
- स्मृती 2004 मध्ये चांदनी चौकातून कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध निवडणूक हारली. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य झाली. गुजरातमधून सध्या राज्यसभेत आहे.