आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल फोबिया - असे ओळखा तुम्ही शिकार तर नाही ना ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार जे मुले रात्री अधिक सक्रिय राहतात ते सोशल फोबियाने पीडित असू शकतात.

काय असतो सोशल फोबिया... विशेष वृत्तांत

काय आहे हा फोबिया?
सोशलफोबिया एक मानसिक रोग आहे. याला सोशल एंजायटीदेखील म्हटले जाते. या रोगाने पीडित व्यक्तीला काही विशेष स्थितीत भीती वाटू लागते. त्याच्या विषयी लोक कायम वाईट विचार आणि पाठीमागे त्याची चेष्टा करतात, असे त्याला वाटू लागते. सोशल फोबियाचा रुग्ण अनोळखी व्यक्तींशी भेटणे किवा लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्यापासून कचरतो. त्याला कायम चिता वाटत असते की, लोकांसमोर तो सहज वावरू शकणार नाही आणि त्यांच्याकडून काहीतरी चूक होईल. यामुळे सर्वजण त्याला अक्षम आणि अयोग्य समजतील. असे लोक इंटरव्ह्य‌ू देणे किवा व्यासपीठावर भाषण देण्यास घाबरतात. ही अस्वस्थता काही लोकांचे करिअरदेखील उद्ध्वस्त करते.