आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soft Drink Causing More Than One Lach Deaths Every Year In India

दरवर्षी 95 हजार कुटुंबांसाठी शीतपेये ठरली ‘थंड मृत्यू’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटिस, डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीज’ने दिलेल्या माहितीनुसार जगात 1.80 लाख लोक दरवर्षी सॉफ्ट ड्रिंकच्या अतिसेवनाने मृत्युमुखी पडत आहेत. असाच एक अहवाल आपल्या देशाबाबतही मार्चमध्ये जारी झाला. अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या प्रतिष्ठित संस्थेने ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडिज-2010’ या अहवालात म्हटले आहे की, भारतात 2010 मध्ये 95 हजार 427 लोकांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण या अतिगोड सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन हे आहे. या मृत्युदरात 1990 च्या तुलनेत 161 टक्के वाढ झाली. 1990 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याच्या सवयीने 36 हजार 591 लोकांचा बळी घेतला होता.

संस्थेचे संचालक बिल हिसेल्स म्हणाले की, अनेक असंसर्गजन्य आजारांनी मरणा-या लोकांच्या आहाराबाबतच्या संशोधनानंतर हे निष्पन्न झाले आहे. 2010 वर आधारित या अहवालातील माहितीनुसार भारतात कोला पिण्याची सवय असलेल्या लोकांपैकी 78 हजार 17 लोक हृदयविकाराने मरण पावले. 11 हजार 314 लोक सॉफ्ट ड्रिंकमुळे मधुमेहाचे रुग्ण बनले. सुमारे 6 हजार 96 लोक कॅन्सरग्रस्त होऊन काळाच्या दाढेत सापडले. अहवालात म्हटले आहे की, 1990 मध्ये 36 हजार 591 लोक विविध असंसर्गजन्य आजारांनी मरण्याचे मुख्य कारण अतिगोड शीतपेयांचे सेवन हे होते. तथापि मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रसायनांचा तपशील या अहवालात नव्हता.

भारतात 2010 मध्ये नैसर्गिकरीत्या मरणाºयांची आकडेवारी गोळा करण्यात आली. त्यासाठी मृत्यूच्या कारणांची उपलब्ध माहिती एकत्र करण्यात आली. अकाली मृत्यूच्या प्रकरणात वय, लिंग व भूभागाच्या विश्लेषणात 67 वेगवेगळे रिस्क फॅक्टर अतिगोड सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याच्या सवयीशी जुळवून पाहण्यात आले व त्यांची तुलना 1990 व 2010 मधील आकडेवारीशी करण्यात आली. ब्रिटनमधील ‘लॅन्सेट’ नियतकालिकात प्रकाशित अहवालातील आकडेवारीचाही या संशोधनात समावेश केला आहे.

भारतात कोला कंपन्यांची पाठीराखी संघटना इंडियन बेव्हरेजेस असोसिएशनचे सरचिटणीस अरविंद शर्मा म्हणाले की, अतिगोड सॉफ्ट ड्रिंक्सने होणाºया मृत्यूंचा अहवाल योग्य नाही. त्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही वर्षांपूर्वी सुनीता नारायण यांच्या अहवालानंतरही अशीच चर्चा झाली होती. त्या वेळी सांगण्यात आले होते की, शीतपेयांत कीटकनाशके आहेत. मात्र, कंपन्यांनी सिद्ध केले की, त्यांच्या फॉर्म्यूलेशनमध्ये कसलीही कमतरता नाही, उलट भारतातील पाणीच अशुद्ध आहे. जो कोका कोला अमेरिकेत विकला जातो तोच भारतातही मिळतो.

शीतपेयांचे 7 साइड इफेक्ट
फॉस्फोरिक अ‍ॅसिड- हाडे व दात कमकुवत होतात.
जास्त कृत्रिम स्वीटनरने सॉफ्ट ड्रिंक्सचे व्यसन लागते.
कारमेल कलर - केमिकल कॅरेमलने तयार केलेला हा रंग पूर्णपणे कॉस्मेटिक असतो. कॅन्सरला कारणीभूत ठरणाºया रसायनात मिश्रण केल्याशिवाय त्याला चव येत नाही.
फूड डाइज - मेंदूवर परिणाम करतात. लक्ष केंद्रित करणे अवघड होते.
हार्ड फु्रक्टोज कॉर्न सिरप - ही संहत साखर आहे. बॉडी फॅट, कोलेस्टेरॉल तर वाढतेच, पण ट्रायग्लिसराइडही तयार होतात व त्यामुळे भुकेची खोटी जाणीव होते.
फॉर्मलडिहाइड - सोड्यात एस्पार्टेम असते. ते पचल्यावर मिथेनॉल बनते. त्याचे फॉर्मिक अ‍ॅसिड व फॉर्मलडिहाइडमध्ये (कॅन्सरकारक) विघटन होते.
पोटेशियम बेंझोएट - हे प्रिझर्वेटिव्ह शरीरात जाऊन बेंझीन (कॅन्सरचे कारक) बनते. सोडा उन्हात ठेवल्यास बेंझीन बनतो.