Home »Divya Marathi Special» Solar Energy Produce In Chandigarh On Guter

चंदिगडच्या नाल्यांवर सौरऊर्जा निर्मिती

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 00:02 AM IST

  • चंदिगडच्या नाल्यांवर सौरऊर्जा निर्मिती

चंदिगड - शहराच्या मध्यवस्तीतून जाणा-या पावसाळी नाल्यांवर लवकरच सोलर पॅनल लावले जाणार आहेत. चंदिगडमधील मास्टर प्लान 2031 अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शहरातील बहुतांश नाल्यांचा भाग या सोलर पॅनलद्वारे झाकला जाणार आहे. सौरऊर्जा निर्मितीबरोबरच नाले आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ, सुंदर बनवण्याचा यामागील उद्देश आहे.

सोलर सिटी म्हणून चंदिगडचा विकास केला जात आहे.
त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदानही मिळाले आहे. याअंतर्गत सोलर पॅनल बनवण्यासाठी तेथील प्रशासनाला योग्य जागा हवीहोती. त्यामुळे गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या कालव्यांवर लावण्यात आलेल्या सोलर पॅनलच्या पार्श्वभूमीवर चंदिगडमधील नाल्यांवर सोलरपॅनल लावण्याचा प्रस्ताव पुढे आला.

सौरऊर्जा निर्मिती व नाल्यांच्या सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प चंदिगड नगरपालिका आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे राबवला जाणार आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे काम चंदिगडमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे देण्यात आले आहे.

Next Article

Recommended