प्रत्येक वेळी एखाद्या व्यक्तीऐवजी त्याच्या विचारांना महत्त्व द्यावे, त्याचे विचार लक्षात ठेवावे असे
आपल्यासा सांगितले जाते. कारण एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवता येते, त्याला मारता येते मात्र त्याचे विचार कायम राहतात असे आपण म्हणतो. हा विचार सार्थ ठरवणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात तर अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत मातृभूमीला इंग्रजांच्या जोखाडातून सोजवण्यासाठी सर्वकाही पणाला लावले.
भगतसिंगांसारख्या काही महान देशभक्तांनी तर अगदी तारुण्यात शहीदत्व पत्करले. पण वर म्हटल्याप्रमाणे हे सर्व आपल्याला सोडून गेले असले तरी, त्यांचे विचार कायम आपल्याबरोबर राहणार आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान या सर्व देशभक्तांनी आपल्याला स्फुरण देणारे काही उद्गार काढले. याच उद्गारांनी पुढे स्वातंत्र्यलढ्यात घोषणांचे रुप घेतले.
पुढील स्लाइडवर वाचा, स्फुल्लिंग चेतवणाऱ्या अशाच काही उद्गारांबाबत...