आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या काही सोप्या युक्त्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्येय गाठण्याच्या अनेक पद्धती आहेत. कंपनीला फायदा मिळवून देणे, ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, तणावातून यशस्वीपणे बाहेर पडून पुन्हा कामाला लागणे याबाबत हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने सांगितलेल्या काही युक्त्या...


आंतरराष्ट्रीय अनुभवी लोकांचा जास्तीत जास्त फायदा उचला
आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या लोकांना ठेवण्याचे अनेक फायदे असतात हे बहुतांश कंपन्यांना माहीत असते. परंतु फारच कमी कंपन्या या संधीचा फायदा उचलताना दिसतात. त्यासाठी आपल्या जबाबदा-या सांभाळताना कामात सुधारणा करणे कधीही इष्ट ठरते.


संबंध भक्कम करा : देश- विदेशातील संपर्क वाढवा. त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्या. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
स्थानिक पातळीवर सुरुवात करा : सोशल मीडियाने नवनवीन संधी तुमच्या दारापर्यंत आणल्या आहेत. त्यापैकी काही संधी तर नेटवर्कपर्यंतचाही मार्ग दाखवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणे महत्त्वाचे आहे. ते करत असताना दोन दिवस हॉटेलव्यतिरिक्त संग्रहालय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.
(स्रोत : ‘जॉइन द ग्लोबल एलीट’, ग्रेगरी सी. ऊनरूह व अँजेल कबरेरा)


प्रशंसा करतानाही घ्या योग्य खबरदारी!
निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ज्या लोकांवर स्तुतिसुमने उधळली जात आहेत, त्यापैकी 40 टक्के लोक दिलेल्या शब्दांपेक्षाही अत्यंत वाईट निर्णय घेण्याची शक्यता असते. किंबहुना स्तुती न होणा-या लोकांच्या तुलनेत हे प्रमाण आहे. लंडन बिझनेस स्कूलमध्ये नीरो शिवनाथन यांनी केलेल्या एका संशोधनात ही बाब सिद्ध झाली आहे.
(स्रोत : हफिंग्टन पोस्ट बिझनेस)


हस्तलिखित टिपणामुळे अधिक प्रभाव
आजकाल हस्तलिखित टिपणे काढणे जवळपास बंदच झाले आहे. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या संभाव्य ग्राहकाला समजावून सांगायचे असेल किंवा सहका-याला एखादा मुद्दा पटवून द्यायचा असेल तर फोन बाजूला ठेवा आणि पेन उचला. ई-मेल, फेसबुक मेसेज किंवा ट्विटच्या माध्यमातूनही तुम्ही ते करू शकता. मात्र हस्तलिखित टिपणाची बातच काही निराळी असते. तुम्हाला समोरच्या व्यक्तीची किंमत माहीत आहे, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही लोकांना किती महत्त्व देता हे त्यांना कळायला हवे. 15 मिनिटे कागद- पेनचा वापर करून तुम्ही त्यांच्याशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित कराल.
(स्रोत : ‘हँडरिटन नोट्स आर अ रेअर कमोडिटी दे आर अल्सो मोअर इम्पोर्टेड दॅन एव्हर’, जॉन कोलमन)


संभाव्य ग्राहक तयार करा
कोणतेही नवीन उत्पादन सादर करण्यापूर्वी ते किती लोक खरेदी करतील, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. ते माहिती करून घेण्याच्या काही पद्धती आहेत. तुम्ही आधीपासूनच उत्पादनाची विक्री करत असाल तर विद्यमान ग्राहकांपर्यंत पोहोचणे तुम्हाला सहज सोपे जाईल. जे ग्राहकांसमान असतात त्या लोकांबाबतही विचार करा. (स्रोत : ‘गो टू मार्केट टूल्स सायझिंग’, थॉमस स्टीनबर्ग व जिल एव्हरी)


संगतीमुळे बिघडू शकते आपले शरीरसौष्ठव
मित्रांच्या संगतीचा खानपान व व्यायामावर परिणाम होतो, हे एका अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. या प्रयोगात काही विद्यार्थ्यांना 30 स्नातकांसोबत ठेवण्यात आले. कॅलिफोर्निया विद्यापीठातील डेव्हिस कारेल यांच्या चमूने केलेल्या संशोधनात निम्म्याहून अधिक विद्यार्थी मित्रासारखे वागल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या फिटनेसमध्येही 20 टक्क्यांची घसरण झाली.(स्रोत : जर्नल ऑफ पब्लिक इकोनॉमिक्स)


डाटा अ‍ॅनालिस्टला
योग्य प्रश्न विचारा

व्यवसायात उन्नती करण्यासाठी डाटाचे पैलू समजून घ्या. विश्लेषणामध्ये तज्ज्ञ नसतात, त्यामुळे ते चुकीचे प्रश्न विचारू शकतात. डाटा कोठून येतो, एखादे नमुना अध्ययन लोकसंख्येचे कसे काय प्रतिनिधीत्व करते, परिणाम कसे मिळतात इत्यादी. या प्रश्नांची नीट उत्तरे मिळत नसल्यास डाटा अ‍ॅनालिस्टला सरळ भाषा वापरण्यास सांगा.
(स्रोत : ‘कीप अप विथ युअर क्वांट्स’, लेखक : थॉमस डेव्हनपोर्ट)


तणावात लोकांना चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन द्या
कंपनी संकटात आहे. दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर आहे किंवा स्पर्धेमुळे दमछाक होत असेल तर अंग झटकून काम करायलाच हवे. कंपनीला नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करणा-या लोकांशीही चर्चा करणे महत्त्वाचे आहे. नेहमी प्रामाणिक आणि सरळमार्गी राहा. विशेषत: जेव्हा वाईट माहिती द्यायची असेल किंवा जटिल बाबतीत चर्चा करायची असेल तेव्हा प्रकर्षाने हे पाळा. तणावाच्या वेळी लोक आपल्यापुरतेच सीमित होऊन जातात. अशा वेळी त्यांना चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांना मेमो वगैरे देऊ नका. आरामात चर्चा करणे शक्य होईल, असे माध्यम निवडा. प्रत्येक पातळीवरील चर्चेत सर्वांना सहभागी करून घ्या. त्यामुळे लोकांचा सक्रिय सहभाग वाढेल आणि काम उत्कृष्ट होईल.
(स्रोत : ‘कॉन्व्हर्सेशन कॅन सेव्ह कंपनीज’, बोरिस ग्रोसबर्ग आणि मायकेल स्लाइंड)


लहरी बॉसच्या जुन्या
कर्मचा-यांशी चर्चा करा

तुमचा बॉस योग्य मार्गदर्शक नसेल तर त्या बॉससोबत काम केलेली एखाद्या व्यक्तीचा शोध घ्या. त्याला चहासाठी आमंत्रण द्या. ती व्यक्ती जे सांगेल ती शिकवणी समजा. ती व्यक्ती तुमच्या बॉसबद्दल काही महत्त्वाची माहिती देते की नाही, याची चाचपणी करा. त्यामुळे तुम्हाला बॉसचा विश्वास जिंकता येईल.
(स्रोत : ‘एचबीआर गाइड टू ऑफिस पॉलिटिक्स’, लेखक : करेन ढिल्लन)