आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस: स्नायूंच्या चिरतारुण्यासाठी उपयुक्त काही टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे की, वाढत्या वयासोबत आपल्या हाडांचीही काळजी घ्या. हाडांची काळजी घेतली पाहिजे. परंतु हा सल्ला पुरुषांनाही लागू होतो. इंटरनॅशनल ओस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या अभ्यासाप्रमाणे नितंबाच्या हाडांच्या सर्व फ्रॅक्चरमधील एक तृतीयांश पुरुषांना असते. अशा फ्रॅक्चरनंतर महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूची शक्यता दुप्पट असते. हाडे मजबूत करणे आणि त्यांना आधार देणा-या मांसपेशी वाढत्या वयानुसार कमी होतात. विस्कॉन्सिन विद्यापीठात व्यायाम आणि क्रीडा विभागाचे प्राध्यापक जॉन पोरकारी सांगतात, मांसपेशी पुन्हा प्राप्त होऊ शकतात, ही चांगली गोष्ट आहे. पोरकारी यांनी स्नायू बळकट करण्याच्या काही टिप्स सांगितल्या.

स्नायू आणि हाडे बळकट करण्याचे मार्ग
खांदे | पोरकारी म्हणतात, ५० ते ६० टक्के पुरुषांना आपल्या जीवनकाळात खांद्याला दुखापत होते. ते मजबूत करून जखमांपासून बचाव करता येतो. अभ्यासात आढळले की, खांद्याचा पुढचा भाग बनवण्यासाठी डम्बल प्रेस सर्वात चांगली पद्धत आहे.
‌हात | वाढत्या वयानुसार सर्वात अगोदर शरीराचा वरचा भाग दुर्बल होऊ लागतो. अमेरिकन व्यायाम परिषद (एसीई) च्या अभ्यासातून पुढे आले की, हाताने डम्बलने गोल गोल व्यायाम बायसेप्ससाठी अनुकूल आहे.
छाती | छातीच्या मांसपेशीही वाढत्या वयानुसार ढिल्या होऊ लागतात; परंतु त्यांना हळुवार पुश-अपने दुरुस्त करणे शक्य आहे. पोरकारी म्हणतात, पुश-अप केल्याने स्नायू बनतात.
कोर अँड अ‍ॅब्ज |छाती, पोट आणि पाठीच्या मजबुतीसाठी वजन उचलण्याचा व्यायाम करावा. रशिया, अमेरिकेसह अनेक देशांत प्रचलित केटलबेल ट्रेनिंगने शरीरातील मुख्य भागाचे स्नायू मजबूत होतात. पाठीवर झोपून पारंपरिक क्रंचेस एक्सरसाइज अधिक मांसपेशी सक्रिय करतो.
खालचा भाग |मांडी, मागच्या भागाचे स्नायू हातात डम्बल ठेवून लंजेस एक्सरसाइझने सुधारतात.