आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणा, लवकर कसा शिकेल मुलगा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलाला स्नेह, प्रोत्साहन आणि समर्थनाची आवश्यकता असते. ज्या मुलांच्या विकासास थोडा उशीर होत असेल, त्यांच्यासाठी हे आणि इतरही आवश्यक असते. बालपणाच्या सुरुवातीला मुले बोलणे, चालणे, स्वत:ची काळजी घेणे आणि खेळण्याच्या गोष्टींवर लक्ष ठेवून पालक हे पाहू शकतात की, मुलांचा विकास मानकांनुसार होत आहे की नाही. याशिवाय इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीची सुरुवातही बालपणातच होते, ज्यात मुलांचे शिकणे आणि समजण्याच्या सीमित क्षमता ओळखल्या जाऊ शकतात. खूप गंभीर स्थिती असलेल्या समस्येची ओळख मुलाच्या जन्माच्या पहिल्या वर्षातच होते.
 
कमी गंभीर समस्येत मुलांच्या संज्ञात्मक विकासावर होणाऱ्या परिणामांची पहिली लक्षणे शाळेत जाण्याच्या सुरुवातीला ओळखता येतात. उदाहरणार्थ- मुलांना शिकण्यात अथवा गणिते सोडवण्यात अडचणी येत आहेत, ही गोष्ट नोटीस केली जाऊ शकते. पालकांचे पहिले काम हे शोधणे आहे की, मुलगा कुठल्या पद्धतीने आणि लवकर व उत्कृष्टपणे शकतो आहे.

व्हिज्युअल लर्नर : या माध्यमातून हे कळू शकते की, मुलगा वस्तू पाहून शिकतो अथवा डायग्राम, मॅप, ड्राॅइंग आदी चित्रांद्वारे शिकतो आहे. जेव्हा मटेरियल त्याच्यासमोर ठेवले जाईल, तेव्हा ते पाहून ताे आत्मसात करू शकेल.

ऑडिटरी लर्नर : यात मुलगा ऐकून चांगले काम करू शकतो. लेक्चर बेस्ट वातावरणात लवकर शिकतो. क्लासरूम, डिस्कशन, मौखिक निर्देश आणि स्टडी ग्रुपद्वारे त्याला फायदा मिळतो. 

कायनेस्थेटिक लर्नर : यात मुलगा मूव्ह करून आणि स्वत: काम करून शिकतो. स्वत: आपल्या हातांनी केलेली अॅक्टिव्हिटी, लॅब क्लासेस, प्रॉप, स्किट्स आणि फिल्ड ट्रिप्सने त्याला फायदा मिळतो.
- डाॅ. नूपुर गुप्ता, चाइल्ड काउन्सेलर, गुरुग्राम
बातम्या आणखी आहेत...