आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न विचारायला घाबरू नका बोलल्याने फायदाच होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्थेच्या यशासाठी तेथे काम करणा-या लोकांचे योगदान महत्त्वाचे असते. कोणताही विचार न करता बॉसने दिलेले काम करण्याऐवजी त्यावर प्रश्न विचारा. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये प्रकाशित झालेल्या टॉकिंग पॉइंट्समधील महत्त्वाच्या केस स्टडीज वाचा.


ई-मेलसाठी तयार केलेला ‘कोटा’ अपडेट करत राहा
ई-मेल व्यवस्थापन करण्याच्या सगळ्या पद्धतींचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर ‘कोटा’ हा प्रभावी उपाय आहे. तुम्ही जेवढे ई-मेल कराल, तेवढे ई-मेल तुम्हाला परत येतात, हे ई-मेलचे वैशिष्ट्य असते. एक ई-मेल पाठवल्यास 4 ते 10 प्रतिक्रिया येतात. अशा पद्धतीने तुम्ही काम वाढवून घेता. दररोज येणा-या ई-मेलचा अंदाज घ्या आणि कोटा ठरवून द्या. येणा-या ई-मेलचे विभाजन करण्यासाठी फिल्टर्स लावा. सर्व महत्त्वाचे ई-मेल्स इनबॉक्सच्या बाहेर ठेवा. इतर सर्व ई-मेलसाठी वेगळे फोल्डर तयार करा. ई-मेल्स नियंत्रणात येणार नाही, तोपर्यंत नवे नवे नियम तयार करत राहा.


कामाविषयी प्रश्न विचारत राहा
कोणतेही काम दिल्यास ते कसे करावे, हा प्रश्न विचारणे संस्थेसाठी हितकारक आहे. ज्या गोष्टींशी आपण सहमत नाहीत, त्याविषयी नेहमी स्पष्ट बोलून दाखवा. मात्र फार कमी लोकांना तक्रारी सांगितलेले आवडते. आपले मत मांडण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घ्या-
श्रोते निवडा : बॉस तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करू शकत नाही. जे प्रत्यक्ष तुमची मदत करू शकतील, अशा लोकांशी समस्येवर चर्चा करा.
उपाय शोधा : तक्रार करणे किंवा समस्या उचलून धरण्याऐवजी त्यावर उपाय शोधा. हे काम तुम्ही केल्यास इतर लोकांनाही उपाय शोधण्यात वेळ घालवावा लागणार नाही.


उपलब्धींविषयी नेहमी
स्पष्टपणे लिहा

आपली कौशल्ये विकणे हाच रिझ्युम बनवण्याचा हेतू आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही बदल घडवून आणला आहे, अशा गोष्टी रिझ्युममध्ये हायलाइट करा. जसे की, तुम्ही सेल्समध्ये असाल तर तुम्ही वार्षिक उद्दिष्ट गाठण्यासाठी काही योगदान दिले आहे का? किंवा तुम्ही कस्टमर सर्व्हिस मॅनेजर असाल तर तक्रारींसाठी आलेले फोनकॉल कमी केले आहेत का? तुम्ही हे कसे केले आणि किती बदल केला? उपलब्धी सांगा. त्यात प्रमोशनविषयी विचारा. जसे की, तुम्ही प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून सुरुवात केली होती. तुमचे चांगले काम पाहता थोड्या वेळात संपूर्ण विभाग तुमच्या अखत्यारीत आला.अशा प्रकारे रिझ्युम लिहा. यामुळे तुमच्यातील पात्रता कळून येतात.


बैठकीचा भाग बना, काम वाढेल
5 जॉब्ज- अमेरिकेतील एखाद्या शहरात शंभरपेक्षा जास्त खोल्या बुक झाल्यास बांधकाम, घाऊक आणि आरोग्य सेवेसंबंधीच्या विभागात दोन ते पाच नव्या नोक-या निर्माण होतात. कोरेनेल विद्यापीठाच्या वृंदा कादियाली आणि रेनाता आणि कोसोवा यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनात 20 प्रश्नांची उत्तरे गोळा करण्यात आली आहेत. फाइव्ह आणि सेव्हन स्टार हॉटेलमधून हा डाटा मिळवला आहे.


जगातील अर्ध्या श्रीमंत महिला चिनी
50% जगातील श्रीमंत महिला चिनी आहेत. रॉयटर्सद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील कुटुंब व्यवस्था. त्यामुळे महिलांना विकास करणे सोपे जाते. तेथील पिढ्यांमधील नात्यांची वीण घट्ट आहे. आजी-आजोबा नात-नातवंडांचे चांगले संगोपन करतात. आई-वडिलांना मुलांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.


आऊट ऑफ द बॉक्स हे फक्त रूपक नाही
32% बोलताना वापरल्या जाणा-या रूपकांचा व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. रूपकांचा शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी एक अध्ययन करण्यात आले. जे लोक कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक पाइपपासून बनलेल्या बॉक्सच्या बाहेर बसले होते, त्यांची उत्तरे 32 टक्के योग्य मिळाली. त्यांना तीन शब्दांशी संबंधित एका शब्दाविषयी विचार करायला सांगितले होते.


एकाच खात्यातपैसा ठेवल्याने फायदा होतो
8.6% जे लोक कमावलेले पैसे एका खात्याऐवजी वेगवेगळ्या खात्यात ठेवतात, ते लोक दीर्घकाळापर्यंत पैसे साठवण्यात अपयशी ठरतात. उठाह विद्यापीठातील हिमांशू मिश्र या संशोधकाने हे संशोधन केले आहे. अनेक खात्यांत पैसा असल्यामुळे आपल्याकडे पैशांचा योग्य हिशेब राहत नाही. त्यामुळे बचत करणे कठीण जाते.