आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Article On News Technology By N Raguraman

मॅनेजमेंट फंडा - माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यात हमखास यश मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव कुमार भुवनेश्वर येथील सिक्युरिटी एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक होते. ४८ वर्षीय कुमार यांना ७५०० रुपये वेतन आणि काही भत्ते मिळत होते. एवढ्या कमी वेतनामध्ये घर खर्च भागत होता, परंतु मुलीच्या लग्नासाठी बचत होत नव्हती. त्यांना आपली कमाई दुप्पट करायची होती. मात्र, आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कसे आणि काय केले पाहिजे, हे त्यांना माहीत नव्हते.
प्रणव यांनी पाच हजार रुपये डिपॉझिट देऊन नवीन काम सुरू केले. मात्र, ग्राहकाला ते जे देत आहेत, त्यात बदल केला आहे. आधी ते संरक्षण देत होते आता पॅकेज्ड भाजी विकतात. ते आपल्या लक्ष्याच्या थोडे जवळ पोहोचले आहेत. आता ते फक्त दोन तास जास्त काम करून मासिक १५ हजार रुपये कमावत आहेत. दररोज सकाळी ताज्या भाज्यांची पाकिटे त्यांना दिली जातात आणि उरलेली पाकिटे सायंकाळी परत केली जातात. भाज्यांची पॅकिंग व्हेजी कार्ट कंपनी करते. प्रणव दर महिन्याला १५ लाख रुपयांची भाजी विकतात. त्यांना कंपनी १० टक्के कमिशन देते. व्हेजी कार्ट दोन वर्षे जुनी कंपनी आहे. याची स्थापना भुवनेश्वर येथील एमजीएम अॅग्रीव्हेंचर्स आणि कुटीर ग्रामीण व्यवस्थापन सेवा यांनी मिळून केली आहे. कृषीसंबंधित इत्थंभूत माहिती असणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक चांगली शेती करण्याच्या पद्धती समजावून सांगणे, हे या कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट होते. तसेच शेतमालाचे उत्पादन आणि कमाई कशी वाढवता येईल, हेदेखील शेतकऱ्यांना सांगितले जाते.

कुटीर चार राज्यांच्या ५५ हजार शेतकऱ्यांसोबत मिळून काम करते. कोणत्या पिकामुळे फायदा होईल, हे शेतकऱ्यांना सातत्याने सांगत आहे. तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी असलेल्या शास्त्रीय पद्धती शेतकऱ्यांना सांगितल्या जातात. हे अभियान नाबार्डचे कर्मचारी ५७ वर्षीय कृष्णचंद्र मिश्रा यांनी सुरू केले आहे. त्यांनी २० वर्षांपर्यंतचा काळ शेतकऱ्यांसोबत घालवला आहे. त्यांनी मायक्रो फायनान्स संस्था ग्रामीण बँक ऑफ बांगलादेशसोबत करार केला आहे. ही बँक नोबेल विजेते मोहंमद युनूस यांनी सुरू केली होती. तसेच बँकेद्वारे बनवण्यात आलेल्या कुटीर सॉफ्टवेअरच्या मदतीने मिश्रा शेती उत्पन्न वाढवत आहेत.

प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. यामध्ये त्याचा सर्व मायक्रो तपशील देण्यात आला आहे. उदा, मातीची स्थिती, आकार, पाणीपुरवठा, काम करणाऱ्या सहकाऱ्यांची संख्या. या सर्वांच्या आधारे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. कुटीरने काही अटी घातल्या आहेत. शेतकऱ्याने कुटीरचे सदस्य व्हावे, तुम्हाला तुमच्या भागामध्ये शौचालय तयार करावे लागेल इत्यादी. ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी १० हजार रुपये लागतात. काही मॉडेल तर फक्त चार हजार रुपयांमध्येही तयार होतात. मात्र, शौचालयाची घाण आसपासच्या जमिनीमध्ये जाऊ नये, हेदेखील कुटीर निश्चित करते. कुटीरची सुरुवात १० लाख रुपयांनी झाली होती. अॅग्री सर्व्हिस आणि स्वच्छतेच्या कामांद्वारे ही कंपनी दरवर्षी ४३ लाख रुपये कमाई करत आहे. २०१५ मध्ये ही रक्कम कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भुवनेश्वरच्या मध्यवर्ती भागात असेंबली लाइन असून तेथे कर्मचारी भाज्या स्वच्छ करतात आणि बॅग्समध्ये भरतात. यांचे वजन २५० ग्रॅम ते एक किलोपर्यंत असते. बॅग्सवर भाजीचे नाव आणि त्याची किंमत लिहिलेली असते. नंतर त्या बॅग्स शहराच्या विविध भागांमध्ये रवाना केल्या जातात. संपूर्ण प्रक्रिया डाटा मॅनेजमेंट आणि दैनंदिन मार्केटचा अभ्यास करूनच केली जाते.
फंडा हा आहे की...
बाजार आधारित अप्रोच आणि माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर कराल तरच तुमच्या व्यापाराचे भविष्य उज्ज्वल होईल.