आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य : फेस्टिव्ह सीझनमध्ये पार्टीलूकसाठी केशरचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणासुदीच्या काळात घरासोबत आपणही टापटीप दिसायला हवे, अशीच प्रत्येकाची धारणा असते. म्हणूनच आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक दिसावे म्हणून केशरचनेत वेगळेपण आणा. तुम्हाला मेकअप व विविध केशरचनांची आवड असली तरी एखादी स्टाईल करावयाची असेल तर रोज नियमितपणे ब्यूटीपार्लरमध्ये जाणे शक्य नसते. मग घरीच काही केशरचना करून पाहा. त्यामुळे लूकसुद्धा बदललेला दिसेल.

पार्टीत जाताना त्याच त्या केशरचनांचा कंटाळा येतो. त्यासाठी एक नवी केशरचना दिली आहे. - सर्वात प्रथम केसाचे मधले पार्टिंग वर घ्या. त्याचे पेड घाला. दोन्ही बाजूला काही केस मोकळे सोडा. मधल्या केसांची सैल पेड असलेली वेणी गुंफा. ही वेणी वरती रबरने बांधून घ्या. साइडच्या केसांना ब्लो ड्राय केल्यानंतर त्यांना त्या सेट केलेल्या वेणीवर पिनअप करा. या पिनअप करण्यासाठी महिलांमध्ये थोडा संयम व थोडा स्मार्टनेस असणे मात्र आवश्यक आहे. व्यवस्थित पिनअप केल्यावर सुंदर व मोठ्या कर्ली जुड्यासारखा लूक येईल.