आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:ला कैलासवासी म्हणवून घेणारा व्यंगचित्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मंगेश तेंडुलकर अखेरच्या श्वासापर्यंत व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत राहिले. त्यांचे पहिले व्यंगचित्र खरे तर १९५४ साली प्रकाशित झाले. पण पूर्णवेळ व्यंगचित्रकार झाल्यावरच त्यांनी पूर्वीची चित्रे प्रदर्शनातून सादर केली.
 
आपल्या हयातीतच आपल्या मृत्यूचे व्यंगचित्र साकारणारे तेंडुलकर नेहमीच वेगळेपण जपणारे कलाकार राहिले. तेंडुलकरांना सोमवारी सकाळी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात  आले.  शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नेत असताना मुलगा महेश आणि मुलगी वंदना यांना जवळ बोलवून त्यांनी आपला रुमाल, मोबाईल, श्रवणयंत्र काढून दिले. तेव्हाच ‘आता मी आऊट आॅफ कव्हरेज जाणार,’ असे उद्गार त्यांनी काढले होते. असे सांगताना त्यांच्या कन्या वंदना यांना भावनावेग आवरता आला नाही.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, कुंचल्याद्वारे वाहतूक नियमांची शिकवण...
बातम्या आणखी आहेत...