आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एअरलाइन्स’ 2 रुपयांत विकली आता 2 हजार कोटींचा वाद; निवडणूक लढणारे पहिले ठाकरे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलानिधी मारन (सन ग्रुपचे प्रमोटर), अजय सिंह  (स्पाइसजेटचे प्रमुख ) - Divya Marathi
कलानिधी मारन (सन ग्रुपचे प्रमोटर), अजय सिंह (स्पाइसजेटचे प्रमुख )
वादग्रस्त... दोन वर्षांपूर्वी एक इतिहास लिहिला गेला. स्पाइसजेट एअरलाइन्सचे ५८.४६ टक्के शेअर्स कलानिधी मारन यांच्याकडून अजय सिंह यांनी खरेदी केले. पहिल्यांदाच एखादी कंपनी ५ रुपयांपेक्षा कमी किमतीत विकली गेली. आता कलानिधी अजयसिंहांकडून २ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई मागत आहेत. या दोघांविषयी...
 
कलानिधी मारन सन ग्रुपचे प्रमोटर
जन्म- २५ जुलै १९६५ 
वडील- मुरासोली मारन, भाऊ दयानिधी 
शिक्षण-डॉन बॉस्को स्कूल, चेन्नई, लोयला कॉलेजमधून पदवी, युनियन ऑफ स्क्रेनटनमधून एमबीए  
कुटुंब- पत्नी कावेरी, मुलगी काव्या
 
यांना दक्षिण भारताचे टीव्ही किंग म्हटले जाते. १९९० मध्ये  यांनी पुमलाई ६५७ नावाने एक व्हिडिओ मासिक सुरू केले होते. उदारीकरणाच्या काळात यांनी कर्ज घेऊन सन टीव्हीची सुरुवात केली. २००६ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनी लिस्टेड झाली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यासोबत राउंड टेबल चर्चेची सुसंधी मिळणाऱ्या जगातील मोजक्या लोकांमध्ये कलानिधींचा समावेश होता. काही वर्षांत ते देशातील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ झाले. त्यांचे आजोबा करुणानिधींनी केंद्रातील यूपीए सरकारला समर्थन दिले होते. कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणात वाढला, पण सरकार बदलताच त्यांचे भाऊ दयानिधी सीबीआय छाप्यांनी घेरले गेले. यानंतर मॅक्सिस कम्युनिकेशन्सद्वारे एअरसेलच्या खरेदीत कलानिधींचे नावही गोवले गेले. त्यांची मुलगी काव्या सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल टीमचे काम पाहते.
 
अजय सिंह स्पाइसजेटचे प्रमुख 
वय- ५१ 
शिक्षण- सेंट कोलंबा स्कूल, नवी दिल्ली, आयआयटी दिल्लीतून बीटेक, कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए (फायनान्स) 
कुटुंब-पत्नी शिवानी,  मुलगी अवनी (स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकतेय)
 
अजय सिंह यांनी ‘अबकी बार मोदी सरकार’चा नारा दिला होता. भाजपच्या प्रचार अभियानात ते कित्येक वर्षांपासून सक्रिय आहेत. १९९६ मध्ये दिल्लीचे तत्कालीन परिवहन मंत्री राजेंद्र गुप्त यांनी परिवहन मंडळाला नवे रूप देण्यासाठी महामंडळाच्या संचालक मंडळात येण्याचे सुचवले. प्रमोद महाजन माहिती व प्रसारण मंत्री झाल्यावर सिंह ओएसडी झाले. दूरदर्शनमध्ये सुधारणा करण्याचे काम सोपवलेे. अजय सिंह यांनी डीडी स्पोर्ट््स व डीडी न्यूजला नव्या पद्धतीने लाँच केले. २००४ मध्येच सिंह यांना भूपेंद्र कनकसागरांनी मोदीलुफ्तच्या संचालक मंडळात येण्याचे सुचवले. तेव्हा त्यांनी कंपनीचे २०%शेअर्स खरेदी केले. त्यांनीच कंपनीला स्पाइसजेट नाव दिले. हळूहळू सिंह बाहेर पडले व २०१० मध्ये कलानिधींनी याचे शेअर्स खरेदी केले. परंतु नुकसान होऊ लागल्याने २०१५ मध्ये सन ग्रुपने शेअर्स सिंह यांना विकले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>चर्चित - मायक्रासाॅफ्टची मालकीण शिकली अॅपल संगणक प्रणाली
>प्रेरक - सर्वात मोठ्या एंजल गुंतवणूक नेटवर्कच्या संचािलका बनल्या
>आठवणी जागवण्यासाठी...
>सध्या चर्चेत - भेटा इरोम शर्मिलांच्या वाग्दत्त वराला
 
>निवडणूक लढणारे पहिले ठाकरे
बातम्या आणखी आहेत...