अनेक कारणांनी महत्त्वपूर्ण असतात शारीरिक हालचाली, ताकद वाढते, स्नायू बळकट होतात, मूड आनंदी राहतो...
1 रोज व्यायाम न करताही मिळवा तितकाच फायदा
दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम स्तरावरील व्यायाम करण्यासंदर्भात अमेरिकेत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. अमेरिकच्या वैद्यकीय संघटनेच्या नियतकालिकेत प्रकाशित एका शोधप्रबंधानुसार नियमित व्यायामाने होणाऱ्या फायद्याइतकाच फायदा आठवड्यातून एक किंवा दोन दिवस थोडे जास्त व्यायाम केल्याने होऊ शकते. युरोपातील ६३ हजारांहून अधिक लोकांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. त्यानुसार, आठवड्यात दोन दिवस १५० मिनिटे व्यायाम केल्यास निष्क्रिय लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका ३० ते ३४ टक्क्यांनी कमी होतो, तर नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या बाबतीत हे प्रमाण ३५ टक्के असते.
2 योग आपली जनुकेही बदलू शकतो
फ्रंटियर्स इन इम्युनोलॉजी या नियतकालिकेत प्रकाशित शोधप्रबंधानुसार, योग आणि ध्यानधारणेमुळे कमकुवत आरोग्य हा तणावाशी संबंधित जनुकांमध्ये परिवर्तन होऊ शकतो. ध्यान, योग, प्राणायाम तसेच गिगोंग तसेच ताई या चिनी ध्यानक्रियेच्या जैविक परिणामांवर आधारित १८ संशोधनांच्या या विश्लेषणात संशोधकांना आढळले की, मेंदू आणि शरीराचे व्यायाम शरीरातील जळजळ, सूज वाढवणाऱ्या जनुकीय हालचालींवर नियंत्रण मिळवते. तणाव अनियंत्रित झाल्यास सुजेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यास नुकसान होतो. नियमित ध्यान आणि योग करणाऱ्यांमध्ये सूज येण्याचे जैविक लक्षण कमी आढळतात. आनुवंशिक जनुकीय स्थिर नसतात. डीएनएच्या हालचाली मानवी नियंत्रणावर अवलंबून असतात.
3 शक्तिवर्धक प्रशिक्षणामुळे शरीर बनते निरोगी
मांसपेशी वाढवणे तसेच शरीरातील हाडे बळकट करण्यासाठी शक्तिवर्धक प्रशिक्षण उत्तम व्यायाम आहे. यामुळे टाइप-२ मधुमेह, हृदयविकारासह अनेक रोग दूर पळतात. एका नव्या संशोधनानुसार, ज्या महिलांनी असे शक्तिवर्धक व्यायाम केले त्यांच्यात टाइप-२ मधुमेहाचा धोका ३० टक्के आणि हृदयविकाराचा धोक १७ टक्के कमी आढळून आला. शरीरशौष्ठव हा अशाप्रकारच्या व्यायामाचा एक प्रकार नसून हातापायांनी वजन उचलूनही फॅट कमी करता येतो. शिवाय, त्याने हाडेही मजबूत होतात.
4 व्यायामाने दिवसभराचे काम होते तणावरहित
कामाचा तणाव दूर करण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे. ऑक्युपेशनल हेल्थ सायकोलॉजी नियतकालिकेत प्रकाशित शोधप्रबंधानुसार, १५ मिनिट पायी चालणाऱ्या लोकांना कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली. दिवसाच्या शेवटी त्यांना थकवा जाणवला नाही. संशोधकांनी १०० कामगारांना भोजनाच्या वेळेत दहा दिवसांसाठी बदल करण्यास सांगितले. त्यापैकी निम्म्या लोकांनी भोजनानंतर जवळच्याच बगिच्यात १५ मिनिटे शतपावली केली, तर दुसऱ्या समूहाने कार्यालयातच दीर्घ श्वास घेणे आणि मानसिक एकाग्रतेशी निगडित व्यायाम केला. यात दोन्ही समूहांना तणाव कमी झाल्याचे वाटले. अप्लाइड सायकॉलॉजी जर्नलच्या एका संशोधनानुसार, रोज जास्त कॅलरी जाळणाऱ्या लोकांत कामाशी संबंधित तणाव आणि राग कमी दिसतो.
5 धावल्याने गुडघेही बळकट होतात
जास्त वेळ धावल्याने सांधेदुखी, गुडघ्याचा त्रास तसेच अन्य समस्या येऊ शकतात. पण एका संशोधनानुसार, थोडेफार धावल्याने गुडघ्याच्या सांध्यातील सूज कमी झाली. धावल्याने दुखापतीची शक्यता अधिक असते की ते दुखापतरोधक असतात याबाबत तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. अप्लाइड फिजिओलॉजी युरोपियन जर्नलमध्ये प्रकाशित एका शोधप्रबंधानुसार, ब्रिघम यंग विद्यापीठाच्या संशोधकांनी १८ ते ३५ वर्षे वयोगटातील १५ तंदुरुस्त धावकांना ३० मिनिटे ट्रेडमिलवर पळवले. पळण्याआधी आणि नंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले. ३० मिनिटे पळल्याने गुडघेदुखी कमी होत असल्याचे दिसून आले.
6 बुद्धी तल्लख होते आणि स्मृतीचा विकास होतो
व्यायामामुळे हृदय वेगाने रक्ताभिसरण करते. शरीरात ऑक्सिजनचा सर्वाधिक उपयोग करणाऱ्या मेंदूसाठी हे फायद्याचे असते. शारीरिक हालचालींमुळे मस्तिष्क पेशीची सुरक्षा, त्यांची दुरुस्ती आणि नव्या पेशींच्या जन्माची न्यूरोट्रॉफिक हालचाल वाढते. व्यायाम करणाऱ्यांच्या मेंदूचा काही भाग जास्त मोठा असतो. अधिक व्यायामाने स्मृती कमकुवत होत नाही. संशोधकांच्या मते, दिवसभरात ६८ मिनिटे सौम्य शारीरिक हालचाली करणाऱ्यांचा मेंदू त्यांच्यापेक्षा कमी सक्रिय लोकांच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त दिसून आला. धावणे, जलतरणसारख्या अॅरोबिक व्यायामाने मेंदूचे आरोग्य अधिक उत्तम राहते.
- अमांडा मॅकमिलन, अॅलिस पार्क, मेंडी ओकलेंडर, अॅलेक्झांड्रा सिफेरलिन.
पुढील स्लाइडवर वाचा, अत्यंत फायद्याचे ६ व्यायामप्रकार...