आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: पंतप्रधान बनण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे : नोबल विजेती मलाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोबल विजेती मलाला सध्या अनेक देशांचा दौरा करत आहे. ‘गर्ल पॉवर ट्रीप’ या उपक्रमांतर्गत तिने नुकतीच इराकमधील मोसूल या युद्धग्रस्त भागातील  निर्वासितांच्या शिबिराला भेट दिली.  योगायोगाने त्याच दिवशी मलालाचा वाढदिवस होता. याबाबत टाइमने तिच्याशी साधलेल्या संवादातील काही मुद्दे....  
 
मुली व शिबिरातील स्थितीबाबत काय वाटते?  
याठिकाणी राहणे सोपे नाही. अनेक अडचणी आहेत. शिक्षण सुरू ठेवण्यास इच्छुक असलेल्या अनेक मुलींना मी येथे भेटले. त्यांची काही स्वप्ने आहेत. त्यांना समाजाला बदलायचे असून शिक्षण परिवर्तनास त्या इच्छुक आहेत.  
 
मोसूलमधून इसिसचा नायनाट झाला. पण, या मुलींची घरवापसी होणार नाही. पाकिस्तानात तू अनुभवलेल्या आव्हानासारखीच स्थिती आहे काय?  
या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. सिरियातील निर्वासित पाचपेक्षा जास्त वर्षांपासून घरापासून दूर आहेत.  शाळेत जाऊ शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय संस्था, सरकार पुरेशा सुविधा देत नाहीयेत. येथे कार्यरत युनिसेफसारख्या संस्थांना जास्त निधीची गरज आहे. मुलींसाठी शिक्षण गरजेचे आहे, हे निर्वासितांना पटवून देणे गरजेचे आहे.  
 
‘गर्ल पॉवर ट्रीप’ अंतर्गत तू किती देशांना भेटी देणार?  
आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील किमान एका देशाला तरी भेट देण्याची माझी योजना आहे. मला मुलींकडून त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकायच्या आहेत. त्यांना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. या शिबिरात राहत असलेल्या नायिरचे वडील हयात नाहीत. ती तीन वर्षे दहशतवादाच्या सावटात होती. तरीसुद्धा तिला अपेक्षा आहेत. निर्वासित मुलेही त्यांचे भविष्य घडवू शकतात.  
 
अभियानातून कोणत्या अपेक्षा आहेत?  
लोकांना अविश्वसनीय गोष्टी ऐकायला मिळतील. येथील लोकांची अवस्था काय आहे? याची कल्पनाही बाहेरचे लोक करू शकत नाहीत. पण, आम्ही गप्प बसू शकत नाही.  
 
या मुलींच्या बाजूने बोलताना तुला स्वत:वर जास्त दबाव वाटतो का?  
मी इतरांकडून नव्हे तर स्वत:कडूनच दबावात आहे. लाखो बालके शिक्षणापासून वंचित आहेत. अशा घटकांना प्रेरणा देणे तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे माझे लक्ष्य आहे.  
इतकी वर्षे लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनून राहणे आव्हानात्मक वाटले?  
मी अकराव्या वर्षी जग बदलायला निघाली होती. सर्व काही सुरळीत करण्यासाठी पाकिस्तानची पंतप्रधान बनण्याची माझी इच्छा होती. पुढाकार घेऊन आपण आपल्या समाजात परिवर्तन आणू शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. पण, हे आव्हानात्मक होते. मी शिकत होती. मला शाळेत जावे लागायचे, परीक्षा द्यावी लागायची. पण, त्यानंतर आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला.    
 
तुझे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे कोणते शिक्षण घ्यायचे आहे?  
मला राजकारण आणि अर्थशास्त्राचे तत्त्वज्ञान शिकायचे आहे. त्यासाठी ऑक्सफोर्डकडून मला प्रस्ताव आला आहे.  
 
तुला पाकची पंतप्रधान व्हायचे आहे का?  
ओह...खूप इच्छा नाही. पंतप्रधान बनण्यासाठी मला ३५ वर्षांची व्हावी लागेल (हसत हसत) त्यासाठी माझ्याकडे सध्या भरपूर वेळ आहे.
बातम्या आणखी आहेत...