आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-मोरक्कन फॅशनचा मिलाफ; गर्भपाताची 50 टक्के कारणे अानुवंशिकतेशी संबंधित...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्मिता अग्रवाल- फॅशन लेखिका, नवी दिल्ली - Divya Marathi
अस्मिता अग्रवाल- फॅशन लेखिका, नवी दिल्ली
पावसाळा ऋतू आला की फॅशन करणाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी असते. कारण या दिवसांत अनेक जण गडद रंगाचे कपडे घालणे पसंत करत नाहीत. अशा वेळी त्यांना हेही समजत नाही की, काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेल्या या ऋतूत कोणते कपडे आपल्याला सूट होतील. 
 
वस्त्रशैली
सेलिब्रिटी रिसॉर्ट वियर डिझायनर नंदिता महतानी यांनी मान्सून ऋतूत पेहरावाचे अनेक प्रकार सांगितले आहे. नंदिताचा सल्ला घेणाऱ्यांमध्ये बॉलीवूडमधील आघाडीचा नायक सलमान खान, क्रिकेटर विराट कोहली यांचा समावेश आहे. त्यांच्या स्टायलिशपणामुळे ते उठून दिसतात. स्टायलिशपणाचा सल्ला देण्याशिवाय नंदिता जवळ इंटेरिअर डिझाइनची अनेक उत्पादने आहेत. जे देश-विदेशात विक्री होतात.  हॉलीवूडमधील दिवा बियॉन्से, नाओमी कंॅपबेल आणि मॅडोना नंदिताचे ग्राहक आहेत. नंदिता डिझाइन करताना समोरच्या व्यक्तीची  आवड-निवड, राहणीमान, विचार व गरजा काय आहेत? तसेच सायंकाळी कोणता पेहराव करण्यास आवडतो, याबाबींचा विचार करते. नंदिता यांनी 2006 मध्ये लंडन व मुंबईमध्ये झालेल्या फॅशन क्लाइंटमध्ये कंटेम्पररी मोरक्कन डिझाइनचा ड्रेस तयार केला होता. या महाेत्सवात ट्यूनिक आणि कुर्ता टॉपमध्ये होता. नंदिता यांनी कशिदाकारीमध्ये कपड्यांचे डिझाइन केले आहे. जे भारतीय सौंदर्याची झलक दाखवण्यासोबत स्टायलिश आणि आरामदायी आहेत. तसेच कुर्ता फ्रेश लॅमन यलो, ब्राइट फुशिया, फ्रेश अॅक्वा अाणि फियरी अाॅरंेज या रंगात असून ते नेहमी वापरले जाऊ शकतात.  पावसाळा लक्षात घेऊन कुर्ता हलके कपड्यांमध्ये तयार केला आहे.
 
फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांचे म्हणणे आहे की,माझ्या कपड्यांची आवड ही कोणत्याही ऋतूत वापरता येणारी आहे. या कपड्यांमध्ये ब्राइट पेस्टल कलर पॅलेटचा वापर केला आहे. तसेच मोरक्कन टॉपला डेनिम सोबत ऑफिसात सिगारेट पेंटसह फॉर्मल जे पावसाळ्यात शर्टसह तुम्ही वापरू शकता.  नंदिता यांच्या अनेक फॅमिनीन आणि लग्झरी कलेक्शन असून ते फॅशन वीक जसे की, लॅक्मे फॅशन वीक, विल्स इंडिया फॅशन वीक प्रदर्शनात पहायला मिळतात. भारतीय रनवे सोबत तसेच  अांतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची भागीदारी आहे. ऑस्ट्रेलिया फॅशन वीक, कोलंबो कुच्योर फेस्टमध्ये ती दिसून येतात. याशिवाय लंडनमध्ये कपड्यांचे प्रदर्शन भरवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 
भारतीय डिझायनरांचे प्रेरणास्थान मोराेक्को : भारतीय डिझायनरांसाठी  मोरोक्को एक प्रेरणास्थान आहे. लॅक्मे फॅशन वीक 2017 मध्ये डिझायनर सोहाया मिश्रा यांनी लेबल चोलाला पहिल्यांदाच सादर केले. जे अधिक गडद आणि कलाकृतीने सजलेले मोरक्कन टाइल्समध्ये होते. तसेच यात जियो मेट्रिक लाइन्सही दिसत होत्या. 2013च्या लॅक्मे विंटर फेस्टिव्हल वीक मध्ये साॅगाट पॉल यांचे कलेक्शन टेराकोटा आणि जेलीज से मोरक्कन आर्किटेक्चरमध्ये उठावदार झाले होते. इंडियन मद्रास कॉटन वीक 2015 च्या ग्रंॅड फिनालेमध्येही मोराेक्को प्रकार दिसून आला. डिझायनर बंदना नरुला यांचा मोरक्कन रॅपटोडी कलेक्शन आघाडीवर होते. तीन भारतीय फॅशन डिझाइनर हे लॅक्मे फॅशन वीकच्या  मोरक्कन फॅशन 2015 स्पर्धेने प्रेरित होते. कृष्णा मेहता का कलेक्शन द गोल्ड एंड द गंगा जर्डिन मोजोरेल गार्डनने प्रेरित होते. डिजायनर फिबिन आणि इमाद यांनी मोराेक्को कलाकृतीशी प्रेरित कपड्यांचे डिझाइन तयार केले आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>गर्भपाताची ५० टक्के कारणे अानुवंशिकतेशी संबंधित
>घरच्या घरी केस रंगवताना अशी घ्या काळजी
>घराच्या बाहेरची स्वच्छता माझे काम नाही
>फायबर व मिनरल चपाती, पाेळी बनवण्याची ही हेल्दी अाणि इनोव्हेटिव्ह पद्धत अाहे.
बातम्या आणखी आहेत...