आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही खास तेलांचा आरोग्यास लाभ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वजन कमी करण्यासाठी तेल किंवा तेलात तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही तेले आरोग्यासाठी लाभदायक आहेत. या पाच तेलांचा आहारात समावेश केल्यास निरामय आयुष्य लाभेल.

ग्रेपसीड ऑइल (द्राक्षब‍ियांचे तेल)
या तेलाला कुठलीही विशेष चव नसते. ते प्रत्येक प्रकारच्या गरम किंवा थंड भाजीत घालता येते. सामान्य तापमानावर हे तेल तीन महिने चांगले राहू शकते. फ्रीजमध्ये ठेवल्यास मात्र ते जास्त दिवस टिकू शकेल.
फायदे। शरीरात व्हिटामिन-ई ची कमतरता दूर करते. या तेलात भरपूर व्हिटामिन-ई असते. एक वेळचे जेवण याच तेलात बनवावे.
वॉलनट ऑइल ( अक्रोडाचे तेल)
या तेलाचा वापर सलाद ड्रेसिंगमध्ये करतात. तयार भाज्यांमध्ये घातल्यास भाज्यांची चव वाढते. गरम भाजीत किंवा भाजी बनवताना ते टाकता येत नाही.
फायदे। वॉलनटमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. हे तेल रोज खाल्ल्यास हृदयविकारांची शक्यता कमी होते.
कोकोनट ऑइल (खोब-याचे तेल)
खाण्याजोगे खोब-या चे तेल बटरऐवजी वापरता येते. कमी उष्णतेवर 350 डिग्रीपर्यंत त्यात अन्नपदार्थ सहज शिजवता येतात. या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे थोड्याशा उष्णतेने हे तेल पघळते. सामान्य तापमानावर ते स्थायूरूपात असते.
फायदे। खोब-या च्या तेलात 90 टक्के सॅच्युरेटेड फॅट्स असतात. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, हे तेल वनस्पतीजन्य असल्यामुळे शरीरात असंतृप्त फॅट्सप्रमाणे वापरले जाते.
अव्होकॅडो ऑइल (रूचिराचे तेल )
हे तेल भाजीत टाकल्यास इतर पदार्थ फारसे वापरावे लागत नाहीत. याचा खास फ्लेव्हर भाजीला वेगळी चव आणतो. या तेलात 520 डिग्रीपर्यंत शिजवता येते. त्यामुळे त्याचा वापर बेकिंग, रोस्टिंग वगैरेंमध्ये केला जातो.
फायदे। हे तेलाचा आहारात वापर केल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी व चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते.
अव्होकॅडो ऑइल (रूचिराचे तेल )
या तेलाचा वापर चायनिज डिश, उदाहरणार्थ नूडल्स आणि ग्रीन सलादमध्ये जास्त केला जातो. हे तेल गरम केल्यास कडवटपणा येतो. थंड ठिकाणी ते टिकून राहते.
फायदे। हे तेल रोस्टिंगसाठी उपयुक्त आहे. यातील घटकांमुळे शरीराला शक्ती मिळते आणि हाडेही मजबूत होतात.