आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृदिन विशेष छायाचित्र: मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुले आपल्यापेक्षाही मोठी व्हावीत, अशीच तर प्रत्येक पित्याची इच्छा असते. अर्थात, हे छायाचित्र शारीरिक उंचीचे आहे. त्यात रॉबर्ट हेरॉल्ड हे विशालकाय गृहस्थ दिसतात. त्यांची उंची आहे ८ फूट ११ इंच. अमेरिकेतील एल्टन शहरात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्यासोबत आहेत त्यांचे वडील हेरॉल्ड फ्रँकलिन. रॉबर्ट हे वडिलांपेक्षा ५ फूट ११ इंच उंच होते. जन्माच्या वेळी रॉबर्ट सामान्य होते, पण पहिल्या वाढदिवशी त्यांची उंची पाच वर्षांच्या मुलाएवढी म्हणजे ३ फूट ६ इंच होती. त्यानंतर ते इतिहासातील सर्वात उंच व्यक्ती ठरले. १९४० मध्ये २२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. आजही या मुलाची उंची कोणीही गाठू शकला नाही. 
बातम्या आणखी आहेत...