आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास वृत्तांत: काय दर असेल स्वस्त तेलाचा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२००९ नंतर तेलाचे दर या वेळी सर्वात कमी आहेत. तेल आपल्या गाड्या, बाइक किंवा इतर वाहनांच्या टाक्या भरण्यापुरते इंधन नाही. ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. त्याच्या किंमतीतील घसरणीचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या घटत्या किमती नव्या नोक-या तयार करतील, तर सध्याच्या नोक-या नष्टही करू शकतील. ते नवतेला प्राधान्य देतील, मात्र त्याचा वेगही कमी करू शकतात. तेलाच्या किंमतींनी अनेक देशांना आधार मिळाला आहे. दुसरीकडे मात्र काही देश दुर्बल बनू शकतात.

स्वस्त तेलामुळे अमेरिकेसह अनेक देशांच्या ग्राहकांच्या खिशात जादा पैसा वाचेल. गेल्या वर्षी जूनमध्ये तेलाची किंमत ६५६९ रुपये प्रति बॅरल होती. आता ३०६९ रु. आहे. कमी दराचा सर्वाधिक फायदा चाकरमाने आणि मध्यमवर्गाला होईल. लोक नवी कार, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कपडे आणि इतर गोष्टींवर खर्च करतील. त्यातून अनेक उद्योगांत नोक-या वाढतील. गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की, तेलाच्या कमी दराने अमेरिकेचा जीडीपी अर्धा टक्का वाढेल. मात्र तरीही बाजारात उत्साह का नाही? जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीन हा तेलाचा मोठा ग्राहक आहे. येथे विकास मंदावल्याने तेलाची मागणी घटली.
चीनच्या बाजारपेठांतील विक्रीवर अमेरिकेचा कारभार अवलंबून असतो. तेलाच्या घटत्या दरामुळे अमेरिकेच्या शेल तेल आणि गॅस उत्पादकांवर दबाव पडत आहे. खडकांमधून नव्या पद्धतीने काढण्यात येणा-या नव्या शेल तेल, वायूने अमेरिकेत एनर्जी बूमची स्थिती आहे. तसे, शेल तेल काढणे महागडे असते. त्याची किंमत अंदाजे ४२९७ रु. एवढी होते. त्यामुळे शेल तेलाचे उत्पादन घटवले गेले आहे. सॅक्स रिपोर्टनुसार यंदा अमेरिकी तेल कारभाराच्या खर्चात १५ टक्के कपात होईल. लंडनस्थित कॅपिटल इकोनॉमिक्सला ६० ते ७० टक्के कपातीचा अंदाज आहे. मॅनहटन संस्थेच्या मते अमेरिकेत एक कोटी नोक-या व २४,४०० अब्ज रुपयांची संपत्ती शेलच्या वाढत्या उत्पादनावर अवलंबून असते. शेल ऑइल, गॅस मॅन्युफॅक्चरर असोसिएशन म्हणते की, या क्षेत्रात पुढील दशकात दहा लाख नोक-या तयार होतील. तेल दर घसरल्याने निर्माण होणा-या नोक-या, वेतन व वृद्धिदरावर परिणाम आगामी काही महिन्यांत लक्षात येईल.