आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतापगडाच्या पायथ्याची महाराजांनी केला होता अफझलखानाचा वध, वाचा छुपे पैलू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
महाराष्ट्र राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत संपन्न झाला आहे. शिवरायांचा इतिहास वाचत असतानाना त्यांच्या अनेक शौर्यमोहिमांपैकी भावणारी आणि मनाला भिडणारी मोहीम म्हणजे अफझलखानाचा वध. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या संपूर्ण घटनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न या स्टोरीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
अफझलखानाने शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता. त्याच उद्देशाने तो महाराष्ट्रात आला होता. त्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची शिवाजी महाराजांबरोबरची भेट निश्चित झाली. त्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांना कैद करायचे किंवा राजांना ठार करून बडी बेगमला भेट द्यायची असे खानाने ठरवले होते. पण प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी संपूर्ण तयारी केली होती. त्यानुसार त्यांना अफझलखानाला मारण्यात यश आले. अशी ही घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेक वेळा आपण ती चित्रपटांतून पाहिली आहे किंवा वाचनातही आली आहे. पण घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय होती, किंवा त्यातील काही बारीक सारीक कांगोरे काय होते हे सर्वांना माहित नाहीत, त्याबाबत औरंगाबाद येथील इतिहास अभ्यासक विजय गवळी यांनी काही माहिती ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे सांगितली आहे, ती यामाध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
अफझलखानाच्या वधाच्या संपूर्ण घटनेबाबत वेगवेगळ्या इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या घटनेवरून किंवा याच्या संदर्भावरून गेल्या काही काळामध्ये वादही निर्माण झालेले पाहायला मिळाले आहेत. पण यामाध्यमातून केवळ या घटनेतील काही असे पैलू जे लोकांना माहिती नसतील किंवा अत्यंत कमी लोकांना माहिती असतील ते सर्वांसमोर आणणे हा एकमेव उद्देश आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, अफझल खानाच्या आक्रमणापासून त्याच्या मृत्यूपर्यंतच्या घटना