आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चित व्यक्ती वादात : मद्यधुंद अवस्थेतील एका चुकीने बेकरचे आयुष्य उद्ध्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरिस फ्रँज बेकर, माजी टेनिसपटू - Divya Marathi
बोरिस फ्रँज बेकर, माजी टेनिसपटू
चर्चित व्यक्ती वादात - बोरिस फ्रँज बेकर, माजी टेनिसपटू 
 
 
जन्म- २२ नोव्हेंबर १९६७, शिक्षण- शालेय
कुटुुंबीय- आई अॅल्विरा, वडील कार्ल बेकर (वास्तुविशारद), पहिले लग्न बार्बरा फेल्टसशी, दुसरे डच मॉडेल शेर्ले लिलीशी. तीन मुले, एक मुलगी  
चर्चेचे कारण- नुकतेच त्याला दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. 
 
जुलै १९८५ मध्ये भारतात टीव्हीचे युग आले, पण फक्त दूरदर्शन हीच वाहिनी होती. त्यावर विम्बल्डनचा सामना सुरू होता. माजी विम्बल्डन विजेता जॉन मॅकेन्रोची लढत एका १७ वर्षीय किशोरवयीनासोबत सुरू होती. अत्यंत संघर्षपूर्ण लढतीत त्या युवकाने मॅकेन्रोला नामोहरम करून सोडले होते. मॅकेन्रोवर विजय मिळवून खळबळ माजवणारा हा युवक म्हणजे बोरिस बेकर. 
 
सर्वात कमी वयात विम्बल्डन जिंकणारा जगातील पहिलाच खेळाडू. ६ तास २२ मिनिटे खेळला गेलेला हा आजवरचा सर्वात प्रदीर्घ सामना आहे. त्यानंतर बोरिसने एकापाठोपाठ एक स्पर्धा गाजवत यशाला आपल्या पायाशी लोळण घालायला भाग पाडले. वयाच्या २२ व्या वर्षीच विम्बल्डन, यूएस ओपन, डेव्हिस कप जिंकून तो टेनिसचा अव्वल खेळाडू बनला. जर्मनीत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बोरिसने नंतर अभिनेत्री बार्बरा फेल्टसशी लग्न केले. त्यांना एक अपत्यही आहे. १९९८ मधील पाच मिनिटांनी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पत्नी गर्भवती असल्याने तिला लंडनच्या रुग्णालयात दाखल करून बोरिस जवळच्याच नोबू रेस्टॉरंटमध्ये मद्यपानासाठी बसला. तिथे अँजेला अॅरमालोव्हा (नंतरची रशियन मॉडेल) ही वेट्रेस होती. बोरिस तिच्या नजरेने घायाळ झाला आणि तिच्यासोबत संबंध आला. या काही मिनिटांनीच बोरिसच्या आयुष्याला ग्रहण लागले व तो अक्षरश: उद्ध्वस्त झाला. बोरिस अँजेलाच्या मुलाचा बाप बनणार असल्याचे फॅक्सला आठ महिन्यांनी कळले. तिने एका खासगी हेराकडून बोरिसची हेरगिरी केली, पण काहीही निष्पन्न झाले नाही. अँजेलासोबतच्या संबंधाचे बार्बराला स्पष्टीकरण देण्यापूर्वीच बोरिसला मारहाण झाली. सुरुवातीला त्याने अँजेलाची मुलगी त्याची असल्यास नकार दिला, पण डीएनए चाचणीत उघड झाल्याने मान्य केले. एकीकडे पत्नी बार्बराला व दुसरीकडे आई बनत असलेल्या अँजेलालाही नुकसान भरपाई द्यायची होती. पत्नीला कोट्यवधी डॉलर  व अँजेलालाही तितकीच रक्कम द्यायची असल्याने बोरिस कंगाल झाला. त्यानंतर तो बीबीसीसाठी समालोचक बनला. या वाहिनीत त्याने जम बसवला. पण पाहता पाहताच हा स्टार टेनिसपटू दिवाळखोर झाला आहे.  
 
सात-आठ वर्षे अज्ञातवासात राहिल्यानंतर २०१३ मध्ये तो योकोविकच्या प्रशिक्षकाच्या रूपात पुढे आला.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> एकाच दिवसात ३३ खटले निकाली काढणारे न्यायमूर्ती
> संयुक्त राष्ट्रात महत्त्वपूर्ण पदी नियुक्त झालेल्या देशातील पहिल्या वकील  
> वास्तुविशारद वृंदा साेमाया कार्नेलमध्ये शिकवणार  
>ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत प्रथम भारतीय उपाध्यक्ष
> देशातील सर्वात यशस्वी तांत्रिक गुंतवणूकदार... 
बातम्या आणखी आहेत...