आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीने शहीद झाला होता हा 'बॉडी बिल्डर' IPS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाविद्यालयात असताना बॉडी बिल्डिंगच्या सरावादरम्यान IPS अशोक कामटे - Divya Marathi
महाविद्यालयात असताना बॉडी बिल्डिंगच्या सरावादरम्यान IPS अशोक कामटे
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र पोलिसांच्या एका शूर वीराला प्राण गमावावे लागले होते. अशोक कामटे असे त्यांचे नाव आहे. महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले अशोक कामटे मुंबई पोलिसांत 'बॉडीबिल्डर' नावाने ओळखले जात होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेवू त्यांच्याबाबत काही...
मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांनी यशस्वीपणे सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच कसाब सारख्या क्रूरकर्म्याला पकडण्यातही पोलिसांना यश आले. पण हा हल्ला झाला त्यानंतर जवळपास 15 ते 20 तासांनंतर केंद्राचे एनएसजी कमांडो आणि इतर पथके मुंबईत दाखल झाली होती. तोपर्यंत मुंबई पोलिस आणि एटीएस या दहशतवाद्यांना तोंड देत होते. दहशतवाद्यांनी एकाचवेळी अनेकठिकाणी हल्ला केल्याने पोलिस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. या हल्ल्यात महाराष्ट्राने अनेक वीर योद्धे गमावले. त्यापैकी एक असणाऱ्या अशोक कामटे यांचा 23 फेब्रूवारी(1965 )रोजी जन्मदिवस असतो. देशासाठी प्राणाची पर्वा न करता अत्यंत निर्भिडपणे या वीराने दहशतवाद्यांचा सामना करत शहीदत्व स्वीकारले. त्यापैकीच एक होते शहीद आयपीएस अधिकारी अशोक कामटे.
अशोक कामटेंचे शिक्षण
कामटे यांचे शालेय शिक्षण कोडाईकनालच्या इंटरनॅशनल स्कूल आणि राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात झाले. त्यांना आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यांनी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. तर दिल्लीच्या संत स्टीफन महाविद्यालयात एम.ए.पूर्ण केले. पेरू येथे जालेल्या ज्युनिअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत 1978 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले.

दहशतवाद्यांशी चर्चा करण्याचे घेतले होते प्रशिक्षण
अशोक कामटे मूळतः पुण्याच्या सांगवी परिसरातील होते. ते 1989 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी होते. कामटे त्यांच्या बॅचमधील सर्वात यशस्वी अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी बंधकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळेच मुंबई हल्ल्याच्या वेळी इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी तडजोड करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते.

26/11 च्या हल्ल्यादरम्यान अशोक कामटे यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेव्हा दहशतवाद्यांचा सामना करताना मुंबईच्या कामा रुग्णालयाजवळ ते शहीद झाले होते. कामटे यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढील स्लाइडवर वाचा अशोक कामटेंविषयी काही रंजक माहिती...
बातम्या आणखी आहेत...