आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमबीए' ते यशस्वी राजकारणी; जाणून घ्या, पंकजा मुंडे-पालवे यांच्या बद्दलच्या 10 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला बालकल्याण व ग्रामिणविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता नुकत्याच त्यांच्या दुष्काळ दौऱ्यातील सेल्फी चर्चेचा विषय आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाड्यात भाजपचे अस्तित्व धोक्यात आल्यासारखे वाटत होते. कोणी एखादा खंदा कार्यकर्ता या भागात नाही असेच येथील जनतेला वाटू लागले होते. केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आशेने पाहिले जात होते. मात्र तेही अचानक निघून गेल्यानंतर मराठवाड्यातील जनतेला आपला वाली कोणीच नाही असे वाटत असतानाच एका झांझावाताप्रमाणे स्व. गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे पालवे समोर आल्या.
पंकजा यांनी अत्यंत कमी दिवसांत जी लोकप्रियता मिळवली आहे ती एखाद्या मुरलेल्या कार्यकर्त्यालाही मिळणे अशक्य आहे. लहानपणापासूनच राजकारण घरात पाहात असलेल्या पंकजा यांना गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यासोबत अनेक राजकीय कामात समाविष्ट करून घेतले आणि आज पंकजा मुंडे - पालवे या महाराष्ट्रातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपाचा नवा चेहरा म्हणून समोर आल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही उतरल्या आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घेऊयात पंकजा मुंडे-पालवे यांच्याविषयीच्या 10 गोष्टी....