आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: जुने शिलेदार म्हणतात, शिवसेना वाढली, पण सैनिक घटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नाशिक/सोलापूर/जळगाव/अकोला- भुकेल्या पोटी उन्हातान्हाची पर्वा करता हिंडून शिवसेना वाढवली. भगवा हाती घेऊन घोषणा देत गावोगाव शाखा काढल्या. शिवसेना वाढत गेली. सत्तेत आली. पण तारुण्याची उमेद पक्षासाठी घालवणारे उपेक्षितच ठरले. मनाने मात्र शिवसैनिकच राहिले. आयुष्याच्या संध्याकाळी आज गोळाबेरीज करताना शल्य त्यांच्या तोंडून बाहेर पडते - शिवसेना वाढली, पण कडवा शिवसैनिक मात्र हरपला..!

१९८५ मध्ये औरंगाबादेत शिवसेना दाखल झाली. ती एक क्रांती होती. प्रत्येक सैनिक झपाटलेला होता. प्रत्येकाला आस्था होती. हिंदुत्व हाच एकमेव अजेंडा होता. परंतु आता ती शिवसेना राहिली नाही. ८० टक्के समाजकारण म्हणणारे १०० टक्क्यांपेक्षाही जास्त राजकारण करताहेत, अशी मते संस्थापक शिवसैनिकांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांचा काळ वेगळा होता. ते गेल्यावरही शिवसेना वाढली. सत्तेतही आली. पण काँग्रेस, राष्ट्रवादीसारखीच ही वाढ होती. सच्चा शिवसैनिक मात्र शिवसेनेपासून दुरावला गेला. निष्ठावंतांची फळी घटत गेली, अशी खंतही या शिवसैनिकांनी बोलून दाखवली. शिवसेनेच्या शाखा स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या जुन्यांशी संवाद साधला असता शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर टीका केली, पण सत्तेच्या मुख्य प्रवाहात असलेल्यांनी मात्र शिवसेना भक्कम असल्याचेच म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, आणखी काय म्हणतात जुने शिलेदार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...